नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावरुन वातावरण तापलं असल्याचं लक्षात आल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी खेद व्यक्त केला आहे. पण त्यांनी माफी मागण्यासाठी अट ठेवली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. पण त्यांनी जाहीरपणे माफी मागण्यासाठी अट ठेवली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सर्वजण त्यांच्या विविध वक्तव्यांवरुन जेव्हा माफी मागतील, मनोज जरांगे जेव्हा त्यांच्या विविध वक्तव्यांवरुन माफी मागतील, तेव्हाच आपण कान पकडून माफी मागणार, अशी भूमिका नवनाथ वाघमारे यांनी मांडली आहे.
नवनाथ वाघमारे काय म्हणाले?
“गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना, आमचे ओबीसी समितीच्या अध्यक्षांच्या वक्तव्याचा दाखला देवून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माझी पत्नी कुणबी समाजाची आहे. तर सून मराठा समाजाची आहे. हे बोलत असताना मराठा समाजाच्या मुली तुम्ही सून केल्यानंतर ओबीसींचे प्रश्न मांडणार नाहीत का? ही त्यांच्यावर आगपाखड करण्याच्या नादामध्ये कुठेतरी राज्यातील मराठा मुलींच्याबाबत माझ्याकडून वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरुन ट्रोल होत आहे. या वक्तव्याचा राज्यात निषेध होत आहे, अशी माहिती मला मिळाली. त्यामुळे मी खुलासा करण्यासाठी समोर आलेलो आहे”, असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
“माझं म्हणणं आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून ज्याप्रकारे आमच्या वंजारी समाजाबाबत भाषा वापरत आहेत. आमच्या धनगर समाजात लाकडं घालण्याची भाषा केली. ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. अनेक मंत्र्यांना घोडे लाऊ अशी भाषा वापरली. मुख्यमंत्र्यांवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली”, असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
“मुंडे बंधू-भगिनी विषयी नेहमी अश्लाघ्य भाषेत बोलणारे मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून अशा प्रकारची भाषा वापरलेली चालते का? मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेली भाषा चालते का? चंद्रशेखर बावनकुळे आमच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली जाते”, असं वाघमारे म्हणाले.
वाघमारेंकडून खेद व्यक्त
“मनोज जरांगे यांनी गॅलक्सी हॉस्पिटलमधून बोलताना माझ्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. माझ्याकडून एक वेळा वक्तव्य गेलं. त्याबद्दल मी खेद व्यक्त करत आहे. माझ्या माता-भगिनींचा अवमान होत असेल तर आम्ही कधीही कानाला धरुन आम्ही येणाऱ्या काळात माफी मागू. तीन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाजाविषयी गलिच्छ भाषेत बोलले”, असंदेखील वाघमारे म्हणाले
शिवकन्यांचा उल्लेख करत वाघमारेंचा प्रश्न
“मनोज जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत बोलताना गलिच्छ भाषेत बोलले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले. मनोज जरांगे यांना कधी जाब विचारणार आहात. त्यांच्याकडून कधी माफी मागणार आहात? असा माझा राज्यातील सर्व शिवकन्यांना प्रश्न आहे”, अशी भूमिका वाघमारेंनी मांडली.
जरांगेंच्या बद्दल शांत का? वाघमारेंचा प्रश्न
“माझ्या मुलींचा फोटो व्हायरल करुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चूक माझी आहे. मला ट्रोल केलं तर मला काही वाटणार नाही. पण माझ्या मुलीला ट्रोल करता, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणता आणि मुलींचे फोटो अशाप्रकारे व्हायरल करता, मग मनोज जरांगेंच्याबाबत तुम्ही कसे शांत आहात?”
‘जरांगेंनी माफी मागितली तर माफी मागणार’
“मी शाहू, फुले, आंबेडकरांचा, अण्णा भाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा वारसदार म्हणून मी मोठ्या मनाने मनोज जरांगे पाटील ज्या दिवशी वंजारी, धनगर, माळी समाजाची माफी मागतील, मुख्यमंत्र्यांची, चंद्रशेखखर बावनकुळेंची माफी मागतील, एकनाथ शिंदेंची माफी मागतील, त्यावेळी मी कानाला धरुन माफी मागेन.”
वाघमारेंचं आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण
“मी पुण्याला बोललो त्याचा मला अत्यंक खेद आहे. असं बोलण्याची माझी कोणतीही मानसिकता नव्हती. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. त्याबद्दल राज्यातील बहिणींनी मला पदरात घ्यावं. कुठेतरी मला समजून घ्यावं. पण मला जसं ट्रोल केलं तस मनोज जरांगेंना करावं. मनोज जरांगे यांच्याकडून माफी मागावी. मी कानाला धरुन माफी मागेन. माझ्या बहिणींकडून माझ्याकडून कधीही चुकीचे शब्द निघणार नाहीत. मनोज जरांगेने माफी मागितली की लगेच काही क्षणात माफी मागेन. मी खेद व्यक्त करतो आणि थांबतो.” दरम्यान, नवनाथ वाघमारेंच्या विरोधात जालना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा