Pune Cafe Flying Gypsy Atharva Jagtap Beating Case Famous Reel Star and Seven People Arrested; ‘तू पोरींना काय बोलला’? ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये तरुणाला मारहाण, प्रकरणाचं सातारा कनेक्शन; पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला अटक
Pune Cafe Flying Gypsy Atharva Jagtap Beating Case Famous Reel Star and Seven People Arrested; ‘तू पोरींना काय बोलला’? ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये तरुणाला मारहाण, प्रकरणाचं सातारा कनेक्शन; पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला अटक
Pune Reel Star Arrested : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील नामांकित ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये झालेल्या वादामुळे पुण्यातील प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार हिच्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
फेमस रीलस्टार माधवी कुंभार अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात आता गुन्हेगारीचं लोण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार्सपर्यंत पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये मध्यरात्री एका 19 वर्षीय तरुणावर कोयत्यानं आणि शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या खळबळजनक प्रकरणात डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत, प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार हिच्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
‘याला जिवंत सोडू नका’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व प्रमोद जगताप (वय 19, रा. आंबेगाव) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. शनिवारी (15 ऑगस्ट) पहाटे सव्वातीनच्या सुमारास अथर्व शिरोळे रोडवरील ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मधून बाहेर येत होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींच्या टोळक्यानं त्याला गाठलं. ‘तू पोरींना काय बोलला, आमच्यासोबत चल, तुला दाखवितो’, अशी धमकी देत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घाबरलेला अथर्व जीव वाचवण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या आत पळाला. मात्र, पाठलाग करत हॉटेलमध्ये घुसलेल्या आरोपींनी ‘याला जिवंत सोडू नका’, असं म्हणत त्याच्या डोक्यात शस्त्राने सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता या टोळक्यानं हॉटेलमधील खुर्च्या फेकून मारत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेचं मूळ पुण्यात नसून साताऱ्यात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. फिर्यादी अथर्व जगताप आणि आरोपी तरुणी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. काही महिन्यांपूर्वीसाताऱ्यातील कास पठार येथे स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात खदखदत असल्यानं, आरोपींनी पुण्यात नियोजनबद्ध पद्धतीनं अथर्ववर हा जीवघेणा हल्ला केला.
जखमी अवस्थेत अथर्वने थेट डेक्कन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. हॉटेल आणि परिसरातील सातत्यानं होणाऱ्या गोंधळ व मारहाणीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं होतं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत प्रसिद्ध रीलस्टार माधवी कुंभार (रा. काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांच्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. या मुख्य आरोपींव्यतिरिक्त त्यांच्यासोबत असलेल्या इतर 7 ते 8 अज्ञात साथीदारांवरही डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावरील वर्चस्व आणि रागाच्या भरातून पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा