Headlines

Samay Raina asks for a biscuit as CM Devendra Fadnavis felicitates at Maharashtra Cyber Cell Event; सर, मी एक बिस्किट घेऊ का? फडणवीसांकडून सन्मान घेतानाही समय रैनाचा मिश्कीलपणा; म्हणाला महाराष्ट्र सायबर सेल ग्रेट, कुठूनही शोधून काढतील


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सायबर गुन्हेगारांकडून पोलिस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीने ‘१९३०’ या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. यावेळी कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना याचाही सन्मान करण्यात आला. समयने याठिकाणीही उपस्थितांनी हसवण्याची संधी सोडली नाही.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर जनजागृती लघुपटाचे आणि ‘१९३० महाराष्ट्र सायबर अँथम’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पोलिस महासंचालक सदानंद दाते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी लघुपट व १९३० महाराष्ट्र सायबर अँथम मध्ये योगदान देणारे कलाकार आशीष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, गायिका सुनिधी चौहान, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, समय रैना आदी कलाकार उपस्थित होते.

समय रैना काय म्हणाला?

समयने स्वतःचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, “सर, या सन्मानाबद्दल आपले खूप खूप आभार; ‘महाराष्ट्र सायबर’सोबत माझे दीर्घकाळापासूनचे संबंध आहेत. आणि हो, ‘१९३०’ हा खरोखरच एक उत्तम क्रमांक आहे. मी स्वतः तो माझ्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे, कारण मला अनेकदा त्याच क्रमांकावरून फोन येतात. ‘महाराष्ट्र सायबर’ अत्यंत सक्रिय आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. तुम्ही अमेरिकेत असा किंवा भारतात, ते तुम्हाला शोधून काढतीलच. आणि हो, ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे.” असं समय म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Maharashtra TimesTukaram Mundhe : पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंती“आणि आज पहिल्यांदाच, सायबर सेलचे अधिकारी सकाळी एका विनोदी कलाकाराच्या घरी आले, त्यांना त्यांच्या घरातून सोबत घेऊन गेले, पण यावेळी ते त्यांना सन्मानित करण्यासाठी आले होते. त्यामुळे, खूप खूप धन्यवाद.” असं समय म्हणाला.

सर, मी एक बिस्किट घेऊ का?

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित होतानाही समयने टायमिंग साधत विनोदाची जागा काढली. ‘सर, मी एक बिस्किट घेऊ शकतो का?’ असा प्रश्न समयने चेहऱ्यावर प्रांजळपणा आणत विचारला. त्यावर फडणवीसांनीही अत्यंत नम्रतेने आणि हसून होकार देत त्याला थोपटले.

मोबाइल, ऑनलाइन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यताही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी पोलिस यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

भीतीला बळी न पडण्याचे आवाहन

सायबर गुन्हेगारांकडून पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगणे, ओटीपी फ्रॉड, बनावट फोन कॉल, पोलिस अथवा सीबीआयच्या नावाने धमकावणे अशा विविध क्लृप्त्यांचा वापर केला जातो. स्क्रीनवर खाकी वर्दीतील व्यक्ती, पोलिस अधिकारी किंवा न्यायाधीशांचे रूप पाहून सामान्य नागरिक घाबरून जातो आणि त्यातून फसवणुकीला बळी पडतो. त्यामुळे अशा कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Maharashtra TimesMPSC Paper Leak : गर्लफ्रेण्डला खुश करायला गौरवने पेपर फोडला, पण औषध निरीक्षक होताच तिने ब्रेकअप केलं, पठ्ठ्याची पोलिसांना टिप, चॅटिंगही समोर‘डिजिटल अरेस्ट’ या ४२ मिनिटांच्या जनजागृतीपटासह विविध क्लिप्स आणि रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यापक अभियान राबवून हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडीओ तयार करण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून सुरू असलेले कार्य प्रशंसनीय असून, भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने व्यापक सायबर जनजागृती मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.