Headlines

Sachin Deshpande Replaced From Number One Channel Serial Due To Less Instagram Followers ; Sachin Deshpande On Casting : इन्स्टावरील कमी फॉलोअर्समुळे नंबर 1 चॅनलच्या मालिकेतून काढलं! अभिनेता सचिन देशपांडेने सांगितलं इंडस्ट्रीचे भीषण सत्य


Sachin Deshpande On Industry Casting System : अभिनेता सचिन देशपांडेने नुकतीच महाराष्ट्र टाइम्सच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. यामध्ये त्याने इंडस्ट्रीत त्याला आलेले वाईट अनुभव शेअर केले. इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्सचा फटका कामाला कसा बसतो याचे वास्तव त्याने या मुलाखतीत दर्शवले.

sachin deshpande
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठमोळा अभिनेता सचिन देशपांडे यांनी नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातले अनेक किस्से शेअर केले. इंडस्ट्री मधल्या बऱ्या वाईट अनुभवांबद्दल सांगितले.

अभिनेता सचिन देशपांडे हा होणार सून मी या घरची या झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. मालिकेतील जान्हवीचा जवळचा मित्र त्याने साकारला होता. पुढे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही त्यांनी उत्तम काम केले. गाठीशी उत्तम अनुभव असूनही बरेचदा instagram वरील फॉलोवर्समुळे हातात काम निसटते अशी खंत त्याने सेलिब्रिटी कॉर्नरला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली.
Maharashtra TimesKangana Ranaut On Hrithik Roshan : हृतिक रोशनची कमेंट कंगना रणौतच्या जिव्हारी लागली! राग व्यक्त-आगीत तेल ओतणं कमी कर अन् गर्लफ्रेंडला फसवू नको; काय घडलं नेमकं?
सचिन देशपांडे यांनी सांगितले की, आजकाल ऑडिशन्सची पद्धत फार बदलली आहे. पूर्वी कलाकारांचे नाव सुचवण्याचं काम दिग्दर्शक करायचा. त्यावेळी डिरेक्टर हाच कॅप्टन ऑफ द शीप असायचा. सिनेमाला दिग्दर्शकाचे फार महत्त्व असते पण त्यावेळी टीव्हीवर सुद्धा दिग्दर्शकाला तितकेच महत्त्व दिले जायचे. पण आता तसे राहिलेले नाही. आता कास्टिंग ही पूर्णपणे वाहिनीच्या हातात गेलेली आहे. चॅनलवर बसलेली लोकं असतात ती तुमचं कास्टिंग लॉक करतात. पूर्वी आम्ही फोन द्वारे किंवा प्रत्यक्षात दिग्दर्शकापर्यंत पोहोचू शकत होतो. पण आता जी लोक तुम्हाला काम देणारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

अभिनेता सचिन देशपांडेने या मुलाखतीमध्ये त्याला याबाबत आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, मला नंबर वन चॅनेलच्या एका मालिकेत कॅमियो रोलसाठी बोलावले होते. मी त्यांना होकार कळवला, मानधनाबद्दलही बोलणं झालं. माझं ज्या प्रोडक्शनवाल्यासोबत बोलणं चालू होतं त्याचा मला काही वेळाने मेसेज आला की दादा तुझा इन्स्टा आयडी पाठवतोस का? मी त्याला यामागचं कारण विचारलं तर तो म्हणाला- तुझे फॉलोवर्स बघायचे आहे. मग मी त्याला माझा इन्स्टा आयडी पाठवला पण पुढे काहीच रिप्लाय आला नाही.

Maharashtra TimesCID Daya On TMKOC : गुण्यागोविंदाची सोसायटी हा फक्त दिखावा! CID च्या दयाकडून तारक मेहताच्या सेटची नाव न घेता पोलखोल, कलाकारांचं खरं वागणं भलतंच
अचानक दोन दिवसांनी मला कळलं की माझ्याजागी त्या मालिकेत दुसऱ्याच एका अभिनेत्याला तिथे रिप्लेस केले गेले आहे. ज्याचे इन्स्टा फॉलोवर्स जास्त होते. आज-काल इंडस्ट्रीमध्ये हाच फॉर्म्युला झाला आहे ज्यामध्ये तुमचे फॉलोवर्स किती आहेत यावर तुमची कास्टिंग ठरते.

सचिन देशपांडेची संपूर्ण मुलाखत येथे पाहा


सचिन देशपांडेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने पदार्पण स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती या मालिकेतून केलेली. या मालिकेत त्याने शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एकाची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी त्याने काही सिनेमांसाठी असिस्टंट दिग्दर्शकाची भूमिकाही साकारलेली. पुढे होणार सून मी या घरची, माझया नवऱ्याची बायको, अजूनही बरसात आहे, पारू यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेले. सध्या तो सन मराठीवरील मालिकेत पाहायला मिळतोय.