Headlines

Rupee Strengthens Against Dollar ; डॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?


अमेरिकेने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम अमेरिकेच्या चलनव्यवस्थेवर झाल्याचे दिसून येत आहे. डॉलर काही अंशा घसरला आहे. अशात भारतीय रुपयाला बळकटी मिळाली आहे. गेल्या सत्रात 95.73 रुपयांवर असलेला रुपया आज 95.56 रुपये प्रति डॉलर किंमतीने मजबूत झाला आहे. एकंदरीत, आता भारताला 1 डॉलर खरेदी करण्यासाठी 95.56 रुपये खरेदी करावे लागणार आहे. गेल्या सत्रातील किंमतीच्या तुलनेने रुपया 17 पैशांनी मजबूत झाला आहे.

डॉलरच्या घसरणीचे मुख्य कारण काय?

जेव्हा डॉलरचे मूल्य कमी होते तेव्हा भारतीय रुपयाचा बाजारभाव वाढतो. अमेरिकेच्या एका निर्णयामुळे डॉलरचा बाजारभाव घसरला आहे. USA Treasury ने काही जुने सरकारी बॉन्ड पुन्हा विकत घेण्याचे ठरवले आहे तसेच बायबॅक दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीवर मिळणारा US bond yields आता कमी मिळणार असा अंदाज तयार झाला आहे. एकंदरीत, जर एखाद्या गुंतवणुकीतून मिळणारे रिटर्न्स कमी असतील तर नक्कीच गुंतवणूकदार तिथे गुंतवणूक करणे टाळणे पसंत करेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी तिथे गुंतवणूक करण्यापासून माघार घेतली. परिणामी, डॉलर्सची मागणी कमी झाली आणि डॉलर काही अंशा घसरला. याचाच फायदा भारतीय चलनाला झाला, रुपयाला 17 पैशांनी बळकटी मिळाली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतले महत्वाचे पाऊल

जेव्हा रुपया कमकुवत होतो, तेव्हा त्याला बळकटी देण्यासाठी RBI कडून महत्वाची पाऊले उचलली जातात. अशावेळी जर एखाद्या कंपनीकडून Dollars ची मागणी करण्यात येत असेल तर सरकारी बँका स्वतःकडे असणारे डॉलर्स मागणी करणाऱ्या कंपनीला विकतात. याने रुपयाला काही अंशा बळकटी येते. सध्या असेच काही चित्र भारतात दिसून येत आहे. देशातील सरकारी बँकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या डॉलरची विक्री केली आणि याचाच काही परिणाम आज रुपयांवर झाल्याची चर्चा सुरू आहे.

एकंदरीत, अमेरिकेने काही जुने सरकारी बॉन्ड पुन्हा खरेदी करण्याचे ठरवले तसेच त्यावरील Buyback दुप्पट केला. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यातून हात मागे सारले. परिणामी, डॉलर्सची मागणी कमी झाली आणि रुपयाला बळकटी मिळाली तर भारतात सरकारी बँकांनी स्वतःकडे असणाऱ्या डॉलर्सची केलेली विक्रीही रुपयाला 17 पैशांनी मजबूती देण्यास कारणीभूत ठरली आहे.

पण रुपयाची ही तेजी किती काळ टिकणार?

Maharashtra TimesProperty Rules: वडिलांनी एकाच मुलाला मालमत्ता दिल्यास दुसऱ्या मुला-मुलीचा हक्क राहतो का? हे कितपत कायदेशीर, नियम काय सांगतोरुपया सध्या मजबूत झाला असला तरी जगात सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे तेजीचा अंदाज बांधणे कठीण आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम रुपयावर आधीपासूनच जाणवत आहे. भारतात वापरात येणारा 90% कच्चा तेल परदेशातून आयात केला जातो. अशात अमेरिका-इराण देशांमध्ये असणाऱ्या तणावामुळे कच्चा तेलाच्या किंमती गगनाला भिडत आहेत. याचा परिणाम भारतीय रुपयाच्या तेजीवर होऊ शकतो. त्याचबरोबर अमेरिकेने Interest Rate संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले आणि डॉलर्ससाठी गुंतवणूकदारांची मागणी पुन्हा वाढली तर रुपया घसरू शकतो. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातील गुंतवणूकही फार महत्वाचा मुद्दा आहे. जर गुंतवणुकीच्या माध्यमातून परदेशातून भारतात डॉलर्स येत असेल तर रुपया मजबूत होऊ शकतो परंतु परदेशी गुंतवणूक कमी झाली तर रुपयावर दबाव वाढू शकतो. तसेच भारतीय कंपन्यांकडून होणाऱ्या डॉलर्स विक्रीवरही रुपयाची तेजी अवलंबून आहे.