Headlines

8th Pay Commission Arrears Rules; 8व्या वेतन आयोगात बसणार मोठा धक्का, पगारात भरघोस वाढ; पण DA, HRA, CEA, LTC चे एरिअर्स विसरायचं, का?


8th Pay Commission News : 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेला आठवा वेतन आयोग 18 महिन्यांनी म्हणजे तब्बल मे 2027 मध्ये केंद्र सरकारला कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनवाढ, डीए यांसारख्या इतर शिफारशींचा अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर नवीन वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि अशा स्थितीत, केंद्रीय कर्मचारांना या काळातील थकबाकीही मिळणे अपेक्षित आहे, पण DA, HRA, LTC आणि CEA ची थकबाकी मिळणार नाही.

केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये थकबाकीची उत्सुकता

देशभरातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67 लाख निवृत्ती वेतनधारकांमध्ये 8 व्या वेतन आयोगाबद्दल तीव्र चर्चा झाली आहे. आयोगाच्या शिफारशींबद्दल दिवसेंदिवस चर्चा जोर धरत असताना कर्मचारी पगारवाढ आणि थकबाकीबद्दलही अधिकाधिक चिंतेत आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर बँक खात्यात किती थकबाकी जमा होईल?

Maharashtra TimesRaghuram Rajan: माणसं काढून AI वापरणाऱ्या कंपन्यांवर कर लादा, कृत्रिम बुद्धीमत्तेचा जेवढा वापर तेवढा कर! अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांचा प्रस्तावनवीन पगारवाढ लागू होताच तुम्हाला मूळ पगारासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, LTC आणि बाल शिक्षण भत्ता यांची मासिक थकबाकी मिळेल असं तुम्ही गृहीत धरलं असेल तर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसू शकतो. वेतन आयोगाच्या नियमांनुसार, प्रत्येक घटकासाठी थकबाकी दिली जात नाही. चला, नवीन पगारातील थकबाकीमागील गणित आणि तुम्हाला कोणते भत्ते मिळणार नाहीत समजून घेऊया.

आठव्या वेतन आयोगातून काय-काय बदलणार

वेतन आयोग केवळ मूळ पगारात वाढ करत नई तर, सरकारी यंत्रणेच्या संपूर्ण वेतनश्रेणी आणि कल्याणकारी भत्त्यांमध्येही सुधारणा करते.

Maharashtra TimesLIC Plan: दररोज फक्त 95 रुपयांची बचत करून वयाच्या शंभरीपर्यंत दरवर्षी मिळवा 80,000 रुपये; छोट्या गुंतवणुकीतून मिळेल लाइफटाइम इन्कमपेन्शनर्ससाठी महागाई सवलत: विद्यमान कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मूळ निवृत्तीवेतनही सुधारित केले जाईल आणि नवीन वेतन मॅट्रिक्सनुसार नवीन महागाई सवलत रचना तयार केली जाईल.

ग्रॅच्युइटी आणि लीव एनकॅशमेंट: सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या कमाल ग्रॅच्युइटीची मर्यादा आणि रजा रोखीकरणाच्या नियमांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे.

वेतन मॅट्रिक्स आणि फिटमेंट फॅक्टर: वेतन मॅट्रिक्सच्या विविध स्तरांसाठी (लेव्हल 1 ते लेव्हल 18) नवीन फिटमेंट फॅक्टर स्थापित केले जातील, ज्यामुळे किमान पगारात लक्षणीय वाढ होईल.

वैद्यकीय अन् रिस्क भत्ता: देशातील दुर्गम भागात तैनात सैनिकांसाठी CGHS सुविधा, वैद्यकीय किंवा रुग्णालयीन भत्ता आणि जोखीम व रिस्क भत्त्यामध्येही बदल केले जातील.

Maharashtra TimesDuty-Free Sugar Import: ऐन सणासुदीच्या साखरेचा गोडवा महाग; 10 वर्षानंतर प्रथमच साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी, डीलर्सना बसणार झटका

थकबाकी अन् भत्ते: सोप्या शब्दात समजून घ्या

घटक निवृत्तीवेतनाची थकबाकी नियम आणि कारण
बेसिक सैलरी (Basic Pay) होय (100%) 1 जानेवारी 2026 पासून वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेपर्यंत फरकाची संपूर्ण थकबाकी मिळेल
महागाई भत्ता नाही महागाई भत्ता जुन्या मूळ वेतनात मर्ज केला जातो, दुप्पट थकबाकी दिली जात नाही.
घरभाडे भत्ता नाही नवीन दर केवळ अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होतील.
CEA आणि LTC नाही हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या दाव्यावर आधारित आहेत, नवीन दर अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होतील.
निवृत्तीवेतनाची थकबाकी होय मूळ निवृत्ती वेतनातील वाढीची थकबाकी निवृत्तीवेतनधारकांना दिली जाईल.

लक्षात घ्या की नव्या वेतन आयोगातून कर्मचाऱ्यांच्या Take-Home Salary आणि EPF मध्येही निश्चितच मोठी वाढ होईल, पण थकबाकीचे कॅलक्युलेशन समजून घेताना केवळ Basic Pay मधील फरक विचारात घेणे फायद्याचे ठरेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत