Headlines

Pune Rain Update Landslide in Maval Taluka Patan Village Home Lonavala Record Break Rain; मावळमध्ये घरावर दरड कोसळली, तिघांच्या मृत्यूची भीती; लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पाऊस, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी


Pune Rain Update : मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने घरातील तीन ते सहा जण अडकले असून त्यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Pune Lonavala Landslide Patan Village Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बंडू येवले, म.टा. प्रतिनिधी लोणावळा : लोणावळ्यासह मावळ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मळवली परिसराला समुद्राचं स्वरुप प्राप्त झालं असून इथल्या घरे आणि बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने हाहाःकार उडाला आहे. लोणावळ्यात आतापर्यंत इतिहासातील सर्वात जास्त म्हणजे सुमारे ६२५ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. हा देशातील एक रेकॉर्ड मानला जात आहे. २४.६१ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे

मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली आहे, तर मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावरच स्लॅब पडला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असून जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेल्याने मुंबई आणि पुणे यांना जोडणारे चारही मार्ग ठप्प झाल्याचे चित्र आहे.
Maharashtra TimesVande Bharat : वेगवान वंदे भारतमुळे उड्डाणपुलावर फवारे, व्हिडिओ खरा की AI? ‘परे’-‘मरे’च्या परस्पर विरोधी दाव्यांनी संभ्रम

बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

मावळमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरात, बंगल्यात पाणी घुसल्याने संसार पाण्यात गेले आहेत. हजारो लोक ठिकठिकाणी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. मळवली परिसराला समुद्राचे स्वरुप प्राप्त झाले असून, येथील घरे व बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले आहे.

लोणावळा परिसराला पुराचा धोका

मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने घरातील तीन ते सहा जण अडकले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. दरडीत अडकलेल्या रहिवाशांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. लोणावळ्यातील टाटाचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लोणावळा शहर व परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Sanjay Jadhav भाजपात जाणार?, चर्चांना लावला फुलस्टॉप, म्हणाले, ‘मी कडवट शिवसैनिक’

विक्रमी पावसाची नोंद

लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी मध्यरात्रीपासून विविध ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी व संपूर्ण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे . पवना धरण पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासात विक्रमी ३७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे असून, मागील १२ तासांत १३ टक्के पाण्याची पातळी वाढली आहे.
Maharashtra TimesMumbai Pune Traffic : मुंबई-पुणे वाहतूक बंद! रेल्वेमार्गावर दरड कोसळली, मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब पडला; तर एक्स्प्रेस वेही ठप्प

वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सार्वजनिक सूचना

सर्व भाविक, वारकरी व नागरिकांना कळवण्यात येते की, इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कोणीही इंद्रायणी नदीपात्राकडे अथवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये. कृपया बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नका. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे.
– माधव खांडेकर मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद, आळंदी

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा