Headlines

Pune Heavy Rain Meteorological Department Issued Red Alert Pune Lonavala; राज्यात पावसाचं थैमान! पुणेकरांनो घराबाहेर निघताना जपून, शहरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचं इशाऱ्यासह मोठं आवाहन


Maharashtra Rain Update : राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकचा काही भाग यांसह विदर्भात मुसळधार पाऊस झाला. कोकणतही जोरदार पावसाने हजेरी लावली. येत्या सहा जुलैपर्यंत सातत्याने मुसळधार पाऊस आणि वादळेदेखील येतील, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रवास टाळता आला, तर टाळावा. हवामान विभागाच्या ॲलर्टनुसार सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Maharashtra Rain Update
पुणे पाऊस अपडेट्स(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहर, जिल्ह्यासह घाट माथ्यावर शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते त्यामुळे पुणेकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. दिवसभर अधूनमधून विश्रांती घेऊन पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली.

पावसाला पोषक वातावरण मिळाले

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे सध्या पुण्यासह राज्यात सर्वदूर पाऊस बरसतो आहे. शनिवारदेखील पुण्यासाठी पावसाचा दिवस ठरला. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी दिवसभर सुरू होता. सकाळी दहाच्या सुमारास आणि दुपारी एकच्या दरम्यान मोठी सर पडली. हवेत गारवाही वाढला होता. पावसामुळे संपूर्ण शहरात वाहतूक संथ झाली होती. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. संध्याकाळी पाचनंतर जोर ओसरला; पण ढगाळ वातावरण कायम होते. शहरात सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत १४.५ मिलिमीटर पाऊस पडला. जुलैच्या पहिल्या दिवसापासून सलग चार दिवस सरी बरसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पुणेकर खूश झालेच शिवाय शेतीची कामे मार्गी लागल्याने शेतकरीही सुखावला.
Maharashtra TimesKetan Grandfather Death : लेकाच्या जाण्याच्या दु:खातून सावरले नाही, तोवर अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर, केतनच्या आजोबांचं निधन; विशाल अग्रवालांची भावनिक पोस्ट

पुढील दोन दिवस पावसाचे

अनुकूल वातावरणामुळे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. शहरात रविवारी दिवसभर आकाश मुख्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार आणि अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे घाट माथ्यासाठी रेड ॲलर्ट देण्यात आला आहे. वर्षासहलीसाठी जाणाऱ्यांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रेड अलर्ट जारी

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिकसह विदर्भातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे-सातारा घाटमाथा परिसरासाठी रविवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
Maharashtra TimesIMD Rain Alert: मुंबईत अतितीव्र मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार, शहराला आजही रेड अलर्ट; इतर जिल्ह्यांमध्ये कशी असणार स्थिती?

मुंबईत पडझड

शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत पडझडीच्या अनेक घटना घडल्या. संततधारेमुळे भांडुपमध्ये शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या खासगी बांधकामालगतचा रस्ता खचला. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास स्व. मीनाताई ठाकरे फूल मार्केटमध्ये मोठे झाड कोसळले. यामध्ये ७० ते ८० गाळ्यांचे नुकसान झाले. नवी मुंबईत पांडवकडा धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर बोईसर येथे सहा वर्षांचा मुलगा नाल्यात वाहून गेला आहे.

ताम्हिणीत २४ तासांत २०० मिमी

घाटमाथ्यावर शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. भिरा येथे २४ तासांत २४३, ताम्हिणीमध्ये २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा येथे १६५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.
Maharashtra TimesMumbai Rain: मुंबई गेली ‘खड्ड्यात’! शहर, उपनगरांतील रस्ते उखडले; BMCच्या डांबरीकरणासह तात्पुरता मुलामा केलेल्या कामाचे पितळ उघडे

राज्यात बहुतांश भागांत मुसळधार पाऊस

रत्नागिरीत नद्यांनी इशारा पातळी सोडली

रायगड जिल्ह्यात नदी, नाले तुंडुंब

वसई-विरारमध्ये पावसाने दाणादाण

गोंदियात पुजारीटोली धरणाचे चार दरवाजे उघडले

भंडाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Maharashtra TimesNavnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला
साताऱ्यात नावली गावातील काही भाग अतिवृष्टीने खचला

कोल्हापुरात पंचगंगा, भोगावती, कासारी, दूधगंगा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा