Headlines

Radhanagari News | अभयारण्य क्षेत्रातील ओलवन-दाजीपूर आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीचे नुकसान; प्रशासनाकडून पाहणी


राधानगरी  – राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात ओलवन-दाजीपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीचे अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपस्थित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.यावेळी अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले

यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिकाताई नांदेकर, राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर. वाय. पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, ओलवन-दाजीपूरच्या सरपंच प्रतिभा कोरगावकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलकुडे (एकनाथ शिंदे गट), राधानगरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष दीपक शेट्ये, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांचे प्रतिनिधी राकेश केरकर, सम्राट केरकर, दयानंद सावर्डेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेट्ये, बांधकाम विभागाचे अभियंता विनायक खोत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत