Headlines

Pune Lohagad Ketan Agarwal Death Case Grandfather Devichand Agarwal Passes Away; लेकाच्या जाण्याच्या दु:खातून सावरले नाही, तोवर अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर, केतनच्या आजोबांचं निधन; विशाल अग्रवालांची भावनिक पोस्ट


Pune Ketan Agarwal Grandfather Death : पुण्याच्या लोहगड किल्ला हत्याकांडातील मृत व्यावसायिक केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले.

Pune Ketan Agarwal Grandfather Death
पुणे केतन अग्रवाल आजोबा निधन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ला येथील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, आता अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 25 वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचंही काल शनिवारी पुण्यात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झालं. नातवाच्या अकाली आणि क्रूर हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती समोर आली आहे.

वडिलांसाठी मुलाची भावनिक पोस्ट

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर ‘मिस यू डॅड’ अशी भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि नातेवाईकांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयाशी संबंधित एक मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती.
Maharashtra TimesIMD Rain Alert: मुंबईत अतितीव्र मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार, शहराला आजही रेड अलर्ट; इतर जिल्ह्यांमध्ये कशी असणार स्थिती?
मात्र, शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारत असतानाच, 18 जून रोजी त्यांचा लाडका नातू केतन अग्रवाल याची लोहगड किल्ल्यावर फिरायला गेलेले असताना हत्या करण्यात आली. नातू केतनच्या या हत्येच्या बातमीनं आजोबा देवीचंद अग्रवाल यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

नातवाच्या मृत्यूच्या अतीव दुःखामुळे आणि धक्क्यामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती अचानक अधिक खालावली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुण्याच्या एका नामांकित खासगी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच महिन्यात तरुण मुलगा आणि घरातील ज्येष्ठ छत्र हरपल्यामुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
Maharashtra TimesMumbai Rain: मुंबई गेली ‘खड्ड्यात’! शहर, उपनगरांतील रस्ते उखडले; BMCच्या डांबरीकरणासह तात्पुरता मुलामा केलेल्या कामाचे पितळ उघडे

लोहगड किल्ल्यावरुन ढकलून हत्या

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी, पोलिसांच्या सखोल तपासात ही पूर्वनियोजित हत्या असल्याचं समोर आलं. केतनची होणारी होणारी पत्नी सिया गोयल (वय 20) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (वय 22) यांनी मिळून नोव्हेंबरमध्ये होणारा विवाह मोडण्यासाठी केतनला किल्ल्यावरून ढकलून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा