Headlines

Shashikant Shinde: शरद पवारांची NCP काँग्रेसमध्ये विलीन होणार? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं – shashikant shinde big statement on ncp sharad pawar party and congress merger


Shashikant Shinde On NCP- Congress merger: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची अफवा आहे, असा दावा शशिकांत शिंदे यांनी शनिवारी केला.

ncp
शशिकांत शिंदे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. केवळ विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठीच अशा अफवा पेरल्या जात आहेत, असा दावा ‘राष्ट्रवादी शप’चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी केला. धर्माच्या नावाखाली कामे करायची आणि पैसा कमवायचा हा अजेंडा भारतीय जनता पक्ष राबवत असल्याचेही ते म्हणाले.

‘राष्ट्रवादी शप’ची पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे , शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

Maharashtra TimesKothrud SRA Project: कोथरुड ‘एसआरए’त 100 कोटींचा घोटाळा; सुनील कांबळेंचा गंभीर आरोप, शंभुराज देसाईंकडून खंडन
‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ताज्या फुटीनंतर ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबाबत चर्चा सुरू झाल्या. विरोधी पक्षांची एकजूट तोडण्यासाठीच सत्ताधारी या अफवा पसरवत आहेत. काँग्रेससोबत अशी चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करीत आहोत. शरद पवार – सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातच काम करणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनीही स्पष्ट केले आहे,’ असे शिंदे म्हणाले.

‘कनेक्टिंग लिंक’ येथील कथित दर्जाहीन कामावरून शिंदे यांनी, ‘सर्वत्र सत्ता असूनही दर्जाहीन कामे होत आहेत; सरकार कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे,’ असा आरोप केला. गृह विभाग व पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारी वाढल्याची टीकाही त्यांनी केली.

Maharashtra TimesNavnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला
धर्माच्या नावाखाली पैसा
‘धर्माच्या नावाखाली कामे करायची आणि पैसा कमवायचा, हा नवीन अजेंडा भाजपच्या माध्यमातून पुढे येत आहे. राम मंदिर व धर्माच्या नावाखाली सत्ता घेऊन पैसा मिळवला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यावर टीका केली आहे. राम मंदिराच्या देणग्यांचा कोणत्या पक्षाने वापर केला आहे का , असे प्रश्न उपस्थित होतात. नाशिकच्या कुंभमेळ्यातही रस्ते बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याबाबत विधिमंडळात प्रश्न विचारला गेला. रामभक्त, हिंदूंमध्येही नाराजी आहे. देणगी चोरीविरोधात आम्हीही आंदोलन करू,’ असे शशिकांत शिंदेे म्हणाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा