Headlines

Jalgaon Sabgavhan Toll Plaza Gas Tanker Accident Two Dead Death Numebrs Likely to Rise; टोलनाक्यावर गॅस टँकरची पाठीमागून ट्रकला धडक, जागीच आग लागल्याने दोघांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता


Jalgaon Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच जळगाव जिल्ह्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

Sabgaon toll naka gas tanker accident
सबगव्हाण टोल नाका गॅस टँकर अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ एका गॅस टँकरनं दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. ही घटना टोल नाक्यावर घडली असल्याने त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

नेमका अपघात कसा झाला?

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सबगव्हाण टोल नाक्याजवळ संध्याकाळी ही घटना घडली. टोल नाक्यावर एका गॅस टँकरने पाठीमागून एका ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर टँकरला आग लागली, या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदर गॅस टँकरला आग लागल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं असताना प्रशासनानं तत्काळ दखल घेत पारोळा अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांना तसेच रुग्णवाहिका चालकांना तत्काळ घटनांसाठी दाखल केलं.
Maharashtra TimesRaigad Rain : अंबा नदीने धारण केलं रौद्ररुप! रायगडमध्ये पावसाचा कहर, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा; हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट
दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की, आग विझवण्यासाठी सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आलं. अपघातानंतर वाहनाला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. परंतु अशी कुठलीही दुर्घटना घडली नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या टँकरमधील असलेल्या किती लोकांचा बळी गेला असेल याचा अंदाज अजून आलेला नसून सदर वाहनातून शव बाहेर काढल्यानंतरच समजणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

दोन ते तीस तास वाहतूक ठप्प

टँकरला आग लागल्यानंतर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन, रुग्णवाहिका प्रशासन व अग्निशामक बंबाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यामध्ये पारोळा धुळे येथील अग्निशामक बंबांना याठिकाणी बोलवण्यात आलं होतं. अपघातामुळे आणि गॅस टँकरला लागलेल्या आगीमुळे सुमारे राष्ट्रीय महामार्गावरील दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
Maharashtra TimesPune Rain News : राज्यात पावसाचं थैमान! पुणेकरांनो घराबाहेर निघताना जपून, शहरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचं इशाऱ्यासह मोठं आवाहन
सदर घटना ही सबगव्हाण टोल नाक्याजवळ घडली असून, ही घटना कशी घडली? याबाबत टोलनाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पोलीस सकाळी सदर घटना कशी घडली? हे निश्चित करणार असून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळाली नसून, टँकरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर या दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची पुण्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा