Headlines

Nepal Flood: नेपाळमध्ये प्रलयबळी 788वर; अडीच हजारांहून अधिक बेपत्ता, शोधपथकांची कसोटी


वृत्तसंस्था, काठमांडू: नेपाळमधील जलप्रलयातील मृतांची संख्या रविवारी ७८८ वर पोहोचली. सुमारे २,५००हून अधिक जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. पूरग्रस्त आठ जिल्ह्यांमध्ये विविध यंत्रणांचे सुमारे २० हजार कर्मचारी बचावकार्यात गुंतले असून, त्यांची कसरत सुरू आहे. भोतेकोशी नदीच्या पाणीपातळीत रविवारी वाढ झाल्याने पूरग्रस्त भागांमध्ये पुन्हा पुराची शक्यता नेपाळ सरकारने वर्तवली आहे.

या प्रलयातील मृतांच्या संख्येबरोबरच बेपत्ता व्यक्तींच्या संख्येतही रविवारी वाढ नोंदवण्यात आली. नेपाळमध्ये २,५०२ जण बेपत्ता असून, त्यात ३२० परदेशी नागरिकांचा समावेश आहे, असे नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये तीन पूरग्रस्त जिल्ह्यांतील २३८ विद्यार्थी आणि १८ शिक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती नेपाळच्या शिक्षण विभागाने दिली.

Maharashtra Timesशाळा जमीनदोस्त, आशा उद्ध्वस्त; पूर गिळायला आला, पोरानं धाडस दाखवलं, चमत्कारिकपणे मृत्यूला चकवलंनेपाळमध्ये आत्तापर्यंत १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, २७५ भारतीय आणि भारतीय वंशाचे १२८ जण अद्याप बेपत्ता आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

नेपाळमध्ये सुमारे २० हजार सुरक्षा कर्मचारी शोध आणि बचाचकार्य करीत आहेत. पूरग्रस्त भागांतून रविवारी सायंकाळपर्यंत ९,४३५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. पूरग्रस्त भागांत अडकलेल्या नागरिकांबरोबरच मदत साहित्य पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे.

Maharashtra TimesNepal Flood: मास्तरांना कडक सॅल्यूट! महापुरासारखा काळ समोर असताना १६४३ विद्यार्थ्यांना वाचवलं, पण शेवटी आक्रित घडलंनेपाळमध्ये रुग्णालये जखमींनी भरली आहेत. तसेच बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी वाढली आहे. मृतांची ओळख पटवणे हे मोठे आव्हान ठरत आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी रुग्णालयांबाहेर छायाचित्रे लावण्यात आली आहेत. आत्तापर्यंत आढळलेल्या मृतदेहांपैकी केवळ १७ जणांची ओळख पटली आहे.

जलविद्युत प्रकल्पांतील ५३७ कर्मचारी बेपत्ता

काठमांडू : नेपाळच्या पूरग्रस्त रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील नऊ जलविद्युत प्रकल्पांतील ५३७ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकल्पांमध्ये २६ ऑगस्टच्या जलप्रलयावेळी ८९८ कर्मचारी कार्यरत होते. त्यातील ३६१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, ५३७ जण बेपत्ता असल्याचे नेपाळच्या ‘आयपीपीएएन’ या ऊर्जानिर्मिती संघटनेने म्हटले आहे. बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर चिखल-मातीचा ढिगारा असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

तिबेटमध्ये ४९ भारतीय बेपत्ता

बीजिंग : तिबेटच्या गिरोंग बंदराजवळील प्रलयामुळे ४९ भारतीयांसह २६१ परदेशी नागरिक बेपत्ता असल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. हे परदेशी नागरिक वेगवेगळ्या २३ देशांतील असल्याचे सांगण्यात आले. तिबेटमध्ये जलप्रलयातील मृतांची संख्या रविवारी १६वर पोहोचली. तर, ५४६ जण अद्याप बेपत्ता आहेत.

Maharashtra TimesNepal Flood: काळ आला होता पण वेळ नाही! नेपाळच्या महाप्रलयात चहाच्या ब्रेकमुळे 5 जणांचे वाचले जीव, रात्रीचा थरारसतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळमधील भोतेकोशी नदीच्या पाणीपातळीत रविवारी वाढ झाल्याने नेपाळ सरकारने पूरग्रस्त जिल्ह्यांना पुन्हा पुराची शक्यता वर्तवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. तिबेटमधील तलावांतून विसर्गामुळे जलप्रवाह वाढणार असल्याची माहिती चीनने दिल्यानंतर नेपाळ सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत