Navi Mumbai Airoli Pregnant Woman Dies : दोघींची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना ऐरोली मनपा रुग्णालयातून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले.
ऐरोली शासकीय रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीच्या शासकीय रुग्णालयात तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐरोली येथील रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला ऐरोली मनपा रुग्णालयातून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप सध्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
सोनम डोंगरे यांचे पती करण डोंगरे यांनी याप्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘आम्ही सोनमला प्रसूतीसाठी ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला कोणता तरी चुकीचा डोस दिला, ज्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडली. आम्ही विचारणा केली असता, डॉक्टर आम्हाला तीन तास तिथेच थांबवून ठेवून ‘तिची तब्येत व्यवस्थित आहे’ असं खोटं सांगत राहिले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांनी तीन तासांनी तिला वाशी येथील महापालिका रुग्णालयात नेण्यास सांगितलं. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा वाशीतील डॉक्टरांनी सोनम आणि पोटातील बाळाला मृत घोषित केलं. ऐरोलीतील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच माझे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहं’, असा गंभीर आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी सोनम डोंगरे या गर्भवती महिलेला ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. आठ महिन्यांची गर्भवती असल्यानं अर्भकाच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार आवश्यक इंजेक्शन देण्यात आलं होतं. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर सोनमला अस्वस्थ वाटू लागलं.
काल बुधवारी रोजी सोनम हिला वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना सोनम डोंगरे या महिलेचा गर्भासह मृत्यू झाला. इंजेक्शनच्या गुणवत्तेची व संपूर्ण उपचार प्रक्रियेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जे. जे. रुग्णालयाचे विभाग प्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ सोसायटीचे सदस्य, तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा