Headlines

I Felt Safe Foreigner Appreciates Mumbais Women Safety in Viral Video | ‘मराठी लोकांमुळेच महिला सुरक्षित’, विदेशी महिलेनं मुंबईचं केलं कौतुक, रात्री १० वाजताही बाहेर फिरताना भिती वाटत नाही


Mumbai Viral Video: एका विदेशी महिलेनं रात्री एकटी फिरताना मुंबईत सुरक्षित वाटल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी तिचे आभार मानत आहेत. लोक म्हणताहेत, सततची वर्दळ, सार्वजनिक वाहतूक, सतर्क पोलीस यंत्रणा आणि मदतीला धावून येणारे नागरिक यामुळे अनेकांना हे शहर तुलनेने सुरक्षित वाटतं.

Mumbai Women Safety
(फोटो सौजन्य – spicygori/Instagram)
मुंबई विरुद्ध देशातील इतर शहरांची तुलना अनेकदा केली जाते. एखाद्या शहरात मुंबईपेक्षा चांगलं वातावरण आहे असं म्हटलं जातं, तर एखाद्या शहराची खाद्यसंस्कृती अधिक समृद्ध असल्याचं सांगितलं जातं. काही ठिकाणी रोजगाराच्या संधी अधिक असल्याचा दावा केला जातो, तर काही शहरांना ऐतिहासिक महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. अर्थात, देशातील प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. मात्र, एका गोष्टीत मुंबईचा हात कोणीही धरू शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे महिला सुरक्षा. होय, एका विदेशी महिलेनं सुरक्षेच्या बाबतीत मुंबईचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रात्री १० वाजता ती मुंबईच्या रस्त्यांवर एकटी फिरत होती, पण कोणीही तिच्यासोबत गैरवर्तन केलं नाही किंवा तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. तिला मुंबईत खूप सुरक्षित वाटलं, असं तिनं म्हटलं आहे. जर तुम्ही मुंबईकर असाल, तर हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटेल.

महिला काय म्हणाली?

​ ​

हा व्हिडिओ spicygori या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही एका विदेशी महिलेला पाहू शकता. ती रात्री दहाच्या सुमारास मुंबईच्या रस्त्यांवर व्लॉगिंग करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ती पूर्णपणे एकटी आहे. तिच्यासोबत इतर कोणीही नाही. खरं तर ही गोष्ट मुंबईकरांसाठी सामान्य आहे. कारण मुंबईत रात्री १२-१ वाजताही महिला सुरक्षितपणे प्रवास करतात. मात्र, विदेशी असल्यामुळे या महिलेला याचं विशेष आश्चर्य वाटलं. कारण असा अनुभव तिला देशातील इतर शहरांमध्ये आला नव्हता. त्यामुळे ती मुंबईतील सुरक्षित वातावरणाचं भरभरून कौतुक करत आहे.

महिलांना मुंबईत सुरक्षित का वाटतं?

​ ​

हा व्हिडिओ ९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेक मुंबईकरांनी तिचे आभार मानले आहेत. काही जण म्हणतात, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्यामुळे येथे महिलांचा सन्मान केला जातो. तर काही जण याचं श्रेय मुंबईच्या स्पिरिटला देतात.

असो, लोकांच्या प्रतिक्रियांचा भाग बाजूला ठेवला तर मुंबई हे तुलनेने सुरक्षित शहर मानलं जातं. काही अपवादात्मक घटना वगळता, महिलांना प्रवास करताना फारशी भीती वाटत नाही. कारण हे शहर कधीच झोपत नाही. दिवसाचे २४ तास वर्दळ असते. शिवाय सार्वजनिक वाहतूक सातत्याने उपलब्ध असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो. त्याचबरोबर मुंबई पोलीसही गुन्हेगारी रोखण्यासाठी कायम सतर्क असतात. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अस्सल मुंबईकर गरजूंच्या मदतीसाठी तत्काळ धावून जातात. कुठे अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाजही उठवतात. त्यामुळे अनेक महिलांना मुंबई तुलनेने सुरक्षित वाटते.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा