Mumbai Mankhurd 24 Year Old Girl Ends Life in Running Local Train Boyfriend Threatens to Obscene Video Viral; आईला अन् तरुणीला अश्लील Video पाठवले, लेकीची माऊलीला शेवटची व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग; मुंबईतल्या तरुणीनं लोकलमध्ये आयुष्य संपवलं
Mumbai Mankhurd 24 Year Old Girl Ends Life in Running Local Train Boyfriend Threatens to Obscene Video Viral; आईला अन् तरुणीला अश्लील Video पाठवले, लेकीची माऊलीला शेवटची व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग; मुंबईतल्या तरुणीनं लोकलमध्ये आयुष्य संपवलं
Mumbai Mankhurd Local Train Young Girl Suicide : मुंबईच्या मानखुर्द परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीने धावत्या रेल्वेतून उडी मारून जीव दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
वाशी मानखुर्द लोकल ट्रेन तरुणीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, मुंबई : बिहार येथे राहणाऱ्या एका तरुणाने मुंबईतील २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तिचे काढलेले अश्लील व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने तरुणीने वाशी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कथित प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
मानखुर्दमध्ये कुटुंबासह राहणारी ही मुलगी एप्रिलमध्ये विवाह सोहळ्यानिमित्त बिहार येथे गेली होती. तिथे तिची अमितकुमार राम (वय २४) याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये फोनवरून सतत बोलणे सुरू झाले. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. याचदरम्यान अमितकुमारने व्हिडीओ कॉलद्वारे तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. काही महिन्यांनंतर तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला. १ ऑगस्ट रोजी आरोपीने तरुणीचे अश्लील व्हिडिओ तिला व तिच्या आईला व्हॉट्सॲपवर पाठवले होते. त्यामुळे ही तरुणी खचली होती. अखेर या तरुणीने आईच्या मोबाइलवर व्हॉट्सॲप ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.
वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव
रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या खाकी गणवेशातील माणुसकीचे दर्शन नवी मुंबईत पुन्हा एकदा घडले. टेम्पो चालवताना चालकाला अचानक फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो दुभाजकावर जाऊन आदळला. ही घटना शुक्रवारी दुपारी ऐरोलीतील खेडेकर सिग्नलजवळ घडली. मात्र, रबाळे वाहतूक शाखेच्या दोन सतर्क पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे टेम्पो चालकाचा जीव वाचला.
टेम्पोचालक अनुज लालजी कौशल हा शुक्रवारी दुपारी एपीएमसी मार्केटमधून कांदिवलीकडे जात होता. ऐरोली येथील खेडेकर चौकात चालक याला अचानक तीव्र फिट आली. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट रस्तेदुभाजकावर आदळला. अपघातानंतर अनुज कौशल गाडीतच बेशुद्ध झाला.
चालकाची प्रकृती आता धोक्याबाहेर
या घटनेची माहिती मिळताच रबाळे वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे आणि सिद्धेश्वर माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रथम चालकाला सावरण्याचा आणि प्राथमिक मदत देण्याचा प्रयत्न केला. चालकाची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे चालकाची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रबाळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी दिली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा