Headlines

Multibagger Stocks; 1 लाख गुंतवणारे आज एक कोटींचे मालक! ‘क्युपिड’मुळे गुंतवणूकदारांना सुपर डुपर फायदा, स्टॉकचा दिग्गजांना धक्का


Crorepati Stock Returns: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने केवळ पाच वर्षांत 100,000 रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले. गुरुवारी, या शेअरने 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला, तर शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये किंचित चढ-उतारपाहायला मिळत आहे.

Cupid Limited Share price
‘क्युपिड’मुळे 1 लाख गुंतवणारे आज एक कोटींचे मालक!(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Multibagger Stocks: शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्सची कमी नाही. यापैकी काही स्टॉक्सनी हजारो-लाखोंच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना दीर्घकाळात श्रीमंत केले तर, काहींनी अगदी कमी कालावधीत गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत मल्टिबॅगर परतावा दिला. क्युपिड लिमिटेड असाच एक स्टॉक आहे, ज्यामध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असते, तर आतापर्यंत करोडपती झाला असता.

पाच वर्षांत 10000% पेक्षा जास्त परतावा

या छुटकू स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, पाच वर्षांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट 2021 रोजी या शेअरचा भाव फक्त 2.41 रुपये होता. तर शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, 262.80 रुपयांना क्लोज झाली. अशाप्रकारे, गेल्या पाच वर्षांत या शेअरने 10,810.37 टक्क्यांची शानदार वाढ नोंदवली आणि गुंतवणूकदारांचा खिसा भरला.

Maharashtra TimesIncome Tax Rule: पतीच्या मालकीचे घर खरेदी करून 7 कोटींचा कर वाचवणाऱ्या महिलेला अखेर कोर्टाकडून दिलासा, प्रत्येकासाठी धडा आहे हा खटलाक्यूपिड लिमिटेड कंडोम, पर्सनल केअरची उत्पादने आणि मेडिकल डायग्नोस्टिक किट्सचे उत्पादन करते व जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये उत्पादने निर्यात केली जातात. अशाप्रकारे कंपनीच्या स्टॉक रिटर्न्सच्या आधारावर गुंतवणूकदारांनी कमावलेल्या नफ्याचे कॅलक्युलेशन केल्यास 2 रुपयांचा हा स्टॉक स्टॉक इतक्या कमी वेळात करोडपती स्टॉक कसा बनला हे दिसून येते.

त्याचवेळी, पाच वर्षांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट 2021 रोजी 2.41 रुपयांना क्युपिड स्टॉकमध्ये एखाद्याने फक्त एक लाखांची गुंतवणूक केली असेल आणि अजूनही शेअर्स होल्ड करून ठेवले असतील तर, आता या गुंतवणुकीवर 10,779% इतक्या मल्टीबॅगर रिटर्न्ससह 1.87 कोटी रुपये झाले असेल.

Maharashtra TimesNew Tax Bill: किती वसूल करणार? 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर शुल्क, युजर्सचा संताप; आता सरकारने दिले स्पष्टीकरण

एका वर्षात सातपट परतावा

दुसरीकडे, केवळ दीर्घकाळातच नव्हे तर क्युपिड लिमिटेड या स्टॉकने एका वर्षातही गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला. गेल्या एका वर्षातही या छोट्या स्टॉकने गुंतवणूकदारांना सात पटींपेक्षा जास्त परतावा दिला असून या काळात क्युपिड शेअरने 682% झेप घेतली. तसेच सहा महिन्यांत 210% दमदार परतावा दिला तर, गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत स्टॉकची किंमत जवळपास 13.17% वाढली आहे.

Maharashtra TimesRBI New Rules: EMI न भरल्यास बँक मोबाईल-लॅपटॉप लॉक नाही करू शकणार; कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा, लोन रिकव्हरीच्या दादागिरीला लगामयाशिवाय स्टॉकच्या या मल्टीबॅगर कामगिरीचा परिणाम थेट कंपनीच्या बाजार मूल्यावर झाला क्युपिडचे बाजार भांडवल आता 34,350 कोटींवर पोहोचले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 267 रुपये आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा