शालार्थ आयडी घोटाळ्याचा SIT तपासाला वेग, अटकेतील भाजप नेत्याला हॉस्पीटलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न? – sit investigation on shalarth id scam and sanjay garud investigation
शालार्थ आयडी घोटाळ्याचा SIT तपासाला वेग, अटकेतील भाजप नेत्याला हॉस्पीटलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न? – sit investigation on shalarth id scam and sanjay garud investigation
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि सरकारची तब्बल १६० कोटींची फसवणूक करणाऱ्या नाशिक शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत सध्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून कसून तपास सुरु आहे. प्रशांत वाडिले हा या घोटाळ्याचा मुख्य मास्टरमाईंड आहे, तर भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड हे या रॅकेटमध्ये सहभागी असलेले मोठे संस्थाचालक आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती उघड झाल्यानंतर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने प्रथम प्रशांत वाडिले याला अटक केली, तर त्यानंतर तपासाचे धागेदोरे शोधत सोलापूरमधून संजय गरुड यांनाही अटक करण्यात आली. मात्र अटक केल्यापासून या प्रकरणातील मुख्य संशयित आणि भाजप नेते संजय गरुड हे पोलिसांच्या अटकेनंतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे नाशिक रोड न्यायालयाने या घोटाळ्यातील १५ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत मोठा दणका दिला आहे! शालार्थ आयडी घोटाळ्यासंदर्भात SIT च्या तपासात आतापर्यंत काय काय समोर आलंय? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया…