Headlines

Mahesh Tilekar : अट घातली, पैसेही जास्त मागितले, वर्षा उसगांवकरांसोबत परफॉर्म करण्यास ‘महानटा’ने दिला नकार; महेश टिळेकरांनी सांगितला किस्सा


Mahesh Tilekar : महेश टिळेकर यांनी एका मुलाखतीमध्ये महानटाचा किस्सा सांगितला आहे.

Mahesh Tilekar On Marathi Actor
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – महेश टिळेकर हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक असून सिनेमांसोबतच ते स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. महेश टिळेकर यांनी त्यांचा ‘मराठी तारका’ हा शो जगभरात पोहोचवला. त्यांनी आजवर अनेक मोठ-मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. अनेक मुलाखतींमध्ये टिळेकर इंडस्ट्रीतील अनुभव सांगत असतात. अशातच आता महेश टिळेकर यांनी एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीतील ‘महानटा’चा अनुभव सांगितला आहे.

महेश टिळेकर यांनी सांगितला अनुभव

मुलाखतीदरम्यान, एखाद्या कलाकाराने काम करण्यासाठी अट घातली आहे का? असं विचारलं असता महेश टिळेकर म्हणाले की, ‘शब्द देऊन आणि तारखा देऊन जर मागे फिरला तर मी म्हणतो, तू मोठा तुझ्या घरी. पण काहींचं खरं कारणही असू शकतं. आम्ही २० अभिनेत्री २० अभिनेते मिळून असा ‘मराठी तारे-तारका’ कार्यक्रम केलेला. रमेश भाटकर यांच्यासोबत अलका कुबल डान्स करणार होत्या. पण, त्यांना तब्येतीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे त्यांनी आधीच मला फोन करून त्याबद्दल सांगितलं. मग, मी रती अग्निहोत्री यांना विचारलं. त्यांनी मग रमेश भाटकर यांच्यासोबत डान्स परफॉर्म केला.’

नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत

‘महानटा’ने दिला नकार

‘त्या कार्यक्रमात वर्षा उसगांवकर आणि समीर धर्माधिकारी यांनी डान्स परफॉर्म केला. समीर यांच्याआधी मी ‘महानटा’ला विचारलेलं. पण, त्या महानटाला त्याच्या पत्नीसोबतच डान्स परफॉर्म करायचा होता. त्यांनी वर्षा यांच्यासोबत डान्स करण्यास नकार दिला. जरी पत्नीसोबत केला तरी त्याचे जास्त पैसे मागितले. मला तर परवडणारे नव्हते. मलाच काय, दुसऱ्या कोणत्याही निर्मात्याला ते परवडले नसते. मराठी इंडस्ट्रीला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून मी तो कार्यक्रम केलेला. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी पहिल्यांदा त्या शोमध्ये डान्स केला आहे.’ असं महेश टिळेकर यांनी पुढे सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश टिळेकर बोलत होते.

Maharashtra TimesDimple Kapadia : ‘स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे’, नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडिया यांचं वक्तव्य
दरम्यान, महेश टिळेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘हवाहवाई’, ‘गाव तसा चांगला’, ‘वन रूम किचन’, ‘घर गृहस्ती’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा