मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने भारताच्या टीम मॅनेजमेंट आणि नियोजनकर्त्यांवर निशाणा साधला आहे.त्याने इंग्लंडसारख्या बलाढ्या संघाविरुद्ध खेळण्यासाठी पराक्रमी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे पदार्पण करणे गरजेचे होते, असे म्हटले आहे. कारण असे झाले असते तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुलभ आणि तणावफ्री झाला असता. वैभवनं आयपीएलमध्ये त्या आक्रमक फलंदाजीने खळबळ उडवून दिलेली आहे. लहान वयामध्येच त्याने प्रचंड दबावात तडाखेबाज फलंदाजी केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. वैभवने केवळ काही सामन्यांमध्येच चांगली खेळी केली आहे, असे नाही तर संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. त्यामुळेच त्याला ऑरेंज कॅप जिंकता आली.
त्याच्या आयपीएलमधील शानदार खेळीनंतर टीम इंडियामध्ये त्याची निवड झाली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टी२० दौऱ्यासाठी त्याला पहिल्यांदाच संधी मिळाली. त्याचा अलिकडचा फॉर्म पाहता आयर्लंडविरुद्ध नक्कीच त्याला संधी मिळेल, अशी शक्यता होती. पण प्लेईंग ११ मध्ये त्याला संधी मिळालीच नाही. पूर्ण मालिकेत एकही सामना त्याला खेळवले नाही आणि आयर्लंडविरुद्ध खराब फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनच्या जागी त्याला इंग्लंडसारख्या बलाढ्य संघासमोर खेळायला उतरवलं.
इंग्लंडच्या जागतिक दर्जाच्या बॉलर्सपुढे खेळताना वैभवची सुरुवात खडतर राहिली. जोफ्रा आर्चरसारख्या वेगवान गोलंदाजाचा सामना करताना वैभवसा फक्त १४, १३, १५ अशा माफक धावांवर समाधान मानावं लागलं. पहिल्या तीन सामन्यांमध्ये धावा न केल्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला पाचव्य़ा आणि अंतिम टी २० सामन्यातून वगळलं आणि संजूला पुन्हा संघात स्थान देण्यात आले.
दरम्यान, भारतासाठी १३ कसोटी आणि १२५ एकदिवसीय सामने खेळलेल्या मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब चॅनलवरून संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. कैफ म्हणाला की,”वैभव एक एक्स-फॅक्टर खेळाडू आहे. त्याने आपल्या कामगिरीने आपली छाप सोडली आहे. इतक्या लहान वयात आणि इतक्या दबावात त्याने आयपीएलमध्ये धावा केल्या. तो केवळ एक-दोन सामन्यांपुरता खेळणारा खेळाडू नव्हता; त्याने ऑरेंज कॅप जिंकली. त्याला आयर्लंडमध्येच खेळायला मिळायला हवे होते. जर तसे झाले असते, तर त्याची सुरुवातीची भीती आणि अस्वस्थता तिथेच संपली असती. मग, जेव्हा तो इंग्लंडमध्ये आला असता, तेव्हा त्याचा आत्मविश्वास एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला असता आणि त्याने तिथेही चांगली कामगिरी केली असती.”
पुढे बोलताना कैफ म्हणाला की, “सामन्यात येण्यापूर्वी तो उत्तम फॉर्मात होता. पण तुम्ही त्याला आधी ड्रिंक्स द्यायला सांगितले. तो एक विशेष खेळाडू आहे. त्याला आयर्लंडमध्ये थेट संधी द्यायला हवी होती. जर कोणाकडे विशेष प्रतिभा असेल, तर त्याला तशी विशेष वागणूक मिळायला हवी. आयर्लंडमध्ये खेळल्याने त्याचा संकोच दूर झाला असता आणि त्याला यूकेमध्ये भीती वाटली नसती. “
दरम्यान, त्यानंतर झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत वैभवने शानदार पुनरागमन केले. वैभवने पहिल्या टी-२० मध्ये एक शानदार अर्धशतक झळकावले. दुसऱ्या टी-२० मध्ये त्याने २० धावांची खेळी केली. तिसऱ्या टी-२० मध्ये सूर्यवंशीने ८१ धावा केल्या. झिम्बाब्वे दौऱ्यात ३ सामन्यांमध्ये ५०.३३ च्या उत्कृष्ट सरासरीने वैभवने एकूण १५१ धावा केल्या आणि त्याला मालिकावीरपुरस्कारही मिळाला. यावरुन कैफ म्हणाला की, या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला चांगल्या व्यवस्थापनाची गरज आहे. तो अजून भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही, पण मला खात्री आहे की जेव्हा तो येथे खेळेल तेव्हा तो खूप धावा करेल.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा