Tharala Tar Mag 5 August 2026 : आजच्या एपिसोडमध्ये सायलीला सोडवण्यासाठी अर्जुन जीवाचं रान करतो. पण प्रियाची प्लॅनिंग इतकी तगडी असते की बऱ्याच गोष्टी या त्याच्या विरोधातच घडत असतात.

सायली प्रियाला बोलते की इतके वेळ तू माझ्याबद्दल बोलत होतीस पण मी ऐकून घेतलं शांत राहिली कारण मला तुझ्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही. पण आता तू माझ्या बाळावर आली आहेस तर मी ऐकून घेणार नाही. तू तुझ्या बाळाच्या भविष्याकडे बघ कारण तू चुकीचे स्वप्न पाहत आहेस. तुला वाटते की मी या तुरुंगात राहील पण माझा नवरा मला नक्की इथून बाहेर काढेल. माझ्या पाठी माझं अख्ख कुटुंब आणि माझा नवरा आहे पण तू एकटी पडली आहेस. सायलीचा हे बोलणं ऐकून प्रिया चिडते पण त्याचा सायलीवर काहीच फरक पडत नाही. याउलट ती आणखी दोन शब्द बोलून तिथून निघून जाते त्यामुळे प्रियाचा तिळपापड होतो.
Mohan Sharma : 100 हून अधिक सिनेमे, आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, उदरनिर्वाह होईना; सुप्रसिद्ध अभिनेत्याची CM कडे मदतीची मागणी
सायलीच्या काळजीने अर्जुन अस्वस्थ झालेला असतो. चैतन्य सोबत तो इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे चौकशीसाठी जातो. सावंत अर्जुन ला सांगतात की आम्हाला एक लीड मिळाली आहे. त्यानुसार आम्ही एका घरावर धाड टाकले तिकडे आम्हाला एक मुलगी आणि एक माणूस सापडला. त्या मुलीची अवस्था फारच बिकट होती. आम्ही त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा आम्हाला त्या माणसाने सांगितले की त्याला हे सगळं सायली सुभेदार यांनीच करायला सांगितले होते. आश्रमातून त्यांनी आणखी काही मुलींना किडनॅप केलं आहे. माझ्याकडे सायली सुभेदार सोबतचे मेसेज सुद्धा आहेत. तो माणूस सुरेश कदम असल्याचं इन्स्पेक्टर सांगतात तेव्हा अर्जुनला धक्का बसतो कारण त्याच माणसाकडे सोनमला सोपवलेलं असतं. त्याच्यासोबत सापडलेली मुलगी सोनमच असते. पण विशेष म्हणजे यावेळी सोनमने सुद्धा सायलीच्या विरोधात स्टेटमेंट दिलेलं असतं. हे ऐकून अर्जुन ला आणखी धक्का बसतो.
Kajol : काजोलचं सीक्रेट वेडिंग पण वडिलांना पसंत नव्हता जावई, एक आठवड्याचा अबोला; लग्न झालं पण पुढे गर्भपाताचं ग्रहणयाशिवाय इन्स्पेक्टर त्याला सांगतात की आपण घाई गडबडीत जे काही कागदपत्र तपासले ते चुकीचे होते. सराईतपणे ते तयार करण्यात आले होते. यामागे खूप मोठी प्लॅनिंग झाली आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. पण ही केस इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे नसून निकम यांच्याकडे आहे त्यामुळे थोडे अडथळे येणार असतात.
अर्जुन थोड्यावेळाने इन्स्पेक्टर निकम यांना सुद्धा भेटायला जातो पण ते सायली वरील गुन्हा किती गंभीर आहे याबद्दल सांगतात त्यामुळे अर्जुन ला पुढच्या हालचाली करता येत नसतात. बाहेर येऊन अजून एक प्लॅन बनवतो कारण सुरेशला सोडण्यात आलेलं असतं हे त्याला कळलेलं. सुरेशने चैतन्यला पाहिलेले नसतं त्यामुळे तो त्याला सुरेशच्या घरी पाठवतो. ती व्यक्ती तोच सुरेश आहे का हे अर्जुन ला कन्फर्म करायचं असतं. चैतन्य व्हिडिओ कॉल ऑन ठेवून सुरेश च्या घरापर्यंत जातो आणि अर्जुन ला त्या मार्फत त्याचा चेहरा दाखवतो. बाहेर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे चैतन्यला सुद्धा सावध राहावं लागतं.
सुभेदारांच्या घरात चिंतेचं वातावरण असतं. मधु भाऊ सायलीला अटक झाल्यामुळे स्वतःला दोष देत असतात. घरातले इतर मंडळी त्यांची समजूत काढतात. अस्मिता बोलते की आता कुठे आपल्या घरात सगळं चांगलं होत होतं पण कदाचित त्या प्रियाचीच नजर लागली असेल. यावर अश्विन सुद्धा ठामपणे म्हणतो की ही नक्कीच त्या प्रियाचीच प्लॅनिंग असणार. ती बाई किती पाताळ यंत्र आहे हे आपल्याला चांगलाच ठाऊक आहे. ती तुरुंगातून सुद्धा हे सगळं मॅनेज करू शकते. श्वेता हे सगळं ऐकते आणि गडबडते. यांचा विषय आणखी वाढला आणि त्यांना नागराज व महिपत यांच्या विरोधात पण लीड मिळाली तर कदाचित एवढ्या प्लॅनिंग वर पाणी फिरू शकतो म्हणून ती सगळ्यांचा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करते. ती मुद्दा म्हणून टीव्ही लावते. पण टीव्हीवर सुद्धा सायलीच्या अटकेचीच बातमी चालू असते. त्यांच्या शेजारचे टीव्हीवर बाईट देत असतात. ते सुद्धा सायलीवर संताप व्यक्त करतात हे पाहून सुभेदारांना धक्का बसतो.

