Headlines

Jiya Shankar : जिया शंकरनं गुपचूप उरकला साखरपुडा, दाखवली होणाऱ्या नवऱ्याची झलक; म्हणाली, ‘हा प्रवास सोपा नव्हता’


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Jiya Shankar Engagement : सुप्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकरनं गुपचूप साखरपुडा उरकला असून होणाऱ्या नवऱ्याची झलक दाखवली आहे.

Jiya Shankar Engagement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकरनं तिच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. जियानं सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. ‘जेव्हा तुम्हाला अजिबात अपेक्षा नसते, नेमक्या त्याच वेळी प्रेम तुमच्या आयुष्यात येतं,’ असं म्हणत तिनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याची झलक दाखवली आहे.

जिया शंकरनं दिली प्रेमाची कबुली

जियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव करण आहे. जियानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये करण एका गुडघ्यावर बसून जियाला प्रपोज करताना दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत जिया तिची अंगठी दाखवत आहे. जियाच्या हातातील ‘ओव्हल-कट’ (Oval-cut) हिऱ्याची अंगठी आणि त्याला मॅचिंग असलेला डायमंड बँड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

रसिकांचं प्रेम, दिग्गजांकडून कौतुक, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’च्या त्रिकूटाशी गप्पा

जिया शंकरची पोस्ट

जियानं करणसोबतचे फोटो शेअर करत लिहिलं की, ‘कदाचित हे खरंच आहे, जेव्हा तुम्हाला अजिबात अपेक्षा नसते तेव्हाच प्रेम मिळतं, पण देवानं इथे माझ्या संयमाची खरंच खूप परीक्षा घेतली. हे सोपं नव्हतं, पण तरीही कुठेतरी ते सहज वाटायचं. तू माझ्यापासून हजारो मैल लांब असलास तरी, तुझ्याशी झालेलं प्रत्येक बोलणं मला अगदी स्वतःच्या घरासारखं वाटायचं. हा प्रवास सोपा नव्हता, पण आपण दररोज एकमेकांची साथ निवडली. ज्या प्रेमाची मी आयुष्यभर वाट पाहिली, ते प्रेम तू मला दाखवलंस. माझ्या अत्यंत कठीण दिवसांतही तू मला हसवलंस. आपण जगात कुठेही असलो, तरी ‘घर’ अशी एक जागा नव्हती, तूच नेहमी माझं घर होतास.’

Maharashtra TimesDimple Kapadia : ‘स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे’, नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडिया यांचं वक्तव्य
‘माझा जोडीदार, माझा मित्र, माझा ABCD…तुझ्यासोबतचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे आणि तो माझा सर्वात आवडता ‘रॉम-कॉम’ सिनेमा आहे. माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवण्यासाठी आणि तू माझ्यावर नेहमी जसं प्रेम केलंस, तसंच उरलेल्या आयुष्यात तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मी आता अजिबात वाट पाहू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, करण.’ असं जियानं शेवटी म्हटलं आहे.दरम्यान, जिया शंकरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं रितेश देशमुखच्या ‘वेड’ या सिनेमात काम केलं आहे. त्याचबरोबर ती बिग बॉसमध्येही झळकली आहे.