Heat Wave Akola : सध्या उन्हाचा पारा सर्वत्र वाढला आहे. अनेक ठिकाणी जीवाची लाहीलाही होते आहे. महाराष्ट्रातलं अकोला हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. आता याबद्दलची मोठी घडामोड समोर आली आहे. अकोल्यात एका तरुण शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला : विदर्भात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून भीषण उष्णतेच्या लाटेने संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने अकोला जिल्ह्यात एका ३० वर्षीय तरुण शेतमजुराचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शिरसोली येथील श्याम इंगळे हे शेतात काम करत असताना त्यांना उष्णतेचा तीव्र फटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विदर्भात उष्माघाताच्या रुग्णांचा आकडा आता ३५० च्या पार पोहोचला असून, एकट्या अकोला जिल्ह्यात ३२३ रुग्णांची नोंद झाली आहे.
प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर आले असून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने उपचार कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातली स्थिती काय?
दुसरीकडे अकोल्यासोबतच अमरावती जिल्ह्यातही १० रुग्ण आढळले असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने कडक नियमावली (SOP) जाहीर केली आहे. अकोला शहरात नागरिकांना भर उन्हात थांबावे लागू नये म्हणून दुपारी १२ ते ५ या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांमध्ये १३० हून अधिक खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून डॉक्टरांची पथके २४ तास तैनात आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानाचा पारा ४८ अंशांपर्यंत जाण्याचा इशारा दिला असल्याने, नागरिकांनी दुपारी १२ ते ५ या वेळेत घराबाहेर पडू नये, सुती कपड्यांचा वापर करावा आणि तहान नसली तरी भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लाट अधिक तीव्र होणार
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे शेतमजुरांच्या कामाच्या वेळाही बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विदर्भातील ही उष्णतेची लाट येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा