Headlines

Shegaon Raid on famous Kachori Center Samples Raw Materials Seized Food and Drug Administration Commissioner Tukaram Mundhe; साईंच्या शिर्डीनंतर तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता माऊलींच्या शेगावात, प्रसिद्ध कचोरी सेंटरवर धाड; कच्च्या मालाचे नमुने जप्त


Buldhana Shegaon Kachori Center FDA Raid : शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकून या कचोरी सेंटरवरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले.

Buldhana Shegaon Kachori Center FDA Raid
शेगाव प्रसिद्ध कचोरी सेंटर छापा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमोल सराफ, बुलढाणा : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. साईंच्या शिर्डीनंतर मुंढेंनी आता आपला मोर्चा गजानन महाराजांच्या नगरीत शेगावमध्ये वळवला आहे. शेगावमधील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकल्याची माहिती समोर आहे. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनानं घेतले आहेत. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासन तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

शेगाव कचोरी सेंटरवर कारवाई करु

शेगावची कचोरी ही प्रसिद्ध आहे व शेगाव येथे आल्यानंतर लाखो भाविक ही कचोरी खातात. मात्र, ही कचोरी कशा पद्धतीने बनवली जाते, त्यासाठी कोणता कच्चामाल वापरला जातो? हे तपासण्यासाठी काल गुरूवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वात अचानक छापा टाकून कचोरी बनवण्यासाठीचं साहित्य व त्याचे नमुने घेण्यात आले, तपासणीनंतर या नमुन्यात जर भेसळ आढळून आली. तर शेगाव कचोरी सेंटरवर कारवाई करण्यात येईल असंही अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Maharashtra TimesLatur News : शेतकरी महिलेनं नांगर ओढला, मदतीसाठी सरकारने बैल दिला; पण तोही आजारीच निघाला, जुंपल्यानंतर काय घडलं?

एकाच वेळी 7 जिल्ह्यांमध्ये छापेमारी

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांमध्ये एफडीएने एकाच वेळी धडक मोहीम राबवत भेसळ माफियांना मोठा दणका दिला आहे. 1 जून ते 9 जून 2026 या अवघ्या 9 दिवसांच्या कालावधीत विभागात तब्बल 27 ठिकाणी धाडी टाकून 2 कोटी 47 लाख 75 हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Maharashtra TimesLadki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारकडून ३४५ कोटी रुपये वर्ग, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
या धडक कारवाईत 9 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून 6 मोठ्या आस्थापना प्रशासनाकडून सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकरले यांनी दिली आहे. एफडीएच्या पथकांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या 7 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही छापेमारी केली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा