Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या सिनेमाचा किस्सा सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कुशल बद्रिके सध्या त्याच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं अभिनेता अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रवीण तरडे कुशल बद्रिकेच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कुशल बद्रिकेनं त्या सीनचा किस्सा सांगितला आहे.
कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा
मुलाखतीदरम्यान कुशल बद्रिके म्हणाला की, ‘प्रवीण तरडेनं एक टिचकी जरी मारली तरी उडून जाणारा माझा देह. त्यामुळे सिनेमात त्यांनी माझ्या कानाखाली मारणं हे विजू माने यांच्यामुळे झालंय. प्रवीण आधी खूप सावरून-सावरून कानशिलात मारण्याचा सीन शूट करत होता. पण विजू माने म्हणाले की, खरं वाटत नाहीये. ते खरं वाटायच्या नादात प्रवीणनं मला खरंच वाजवली आहे. सीन शूट करताना मला प्रवीण म्हणालेला, ‘तू काळजी नको करुस, बाजूने जाईल.’ पण, तो बाजूने नाही गेला, भाजून गेला.’ ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुशल बद्रिके बोलत होता.
राणीच्या मनात काय? बोल बोल राणीच्या टीमसोबत गप्पा
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमाबद्दल
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात कुशल बद्रिकेसोबत अंकुश चौधरी, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर हे अभिनेतेही मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक विजू माने म्हणाले होते की, ”स्ट्रगलर साला’ सिनेमातील संत्या, बाबा आणि कुश्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. यावेळी त्यांच्या आयुष्यात मामा येतो आणि त्या चौघांचा प्रवास पूर्णपणे बदलून जातो. हा प्रवास जितका मजेशीर आहे तितकाच अनपेक्षितही आहे. प्रत्येक पात्राची स्वतःची एक वेगळी मजा आहे आणि प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना हसवतानाच पुढे काय होणार? याची उत्सुकता कायम ठेवतो. ही गोव्याची ट्रिप प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.’ Prashant Damle On Ashok Saraf : ‘अशोक सराफ यांच्याकडून कौतुक ऐकण्यासाठी १८ सिनेमे करावे लागले’, प्रशांत दामलेंनी सांगितला किस्सा दरम्यान, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या सिनेमामध्ये प्रवीण तरडे, संजय जाधव, महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, अवधूत गुप्ते, मकरंद देशपांडे आणि प्रवीण तरडे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा