Pravin Tarde Post : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या त्यांच्या ‘देऊळ बंद २’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमावर काहींनी टीकाही केली. त्यावर प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तरही दिलं. त्यामुळे प्रवीण तरडे स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अशातच आता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रवीण तरडे यांची पोस्ट
प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मुळशीमध्ये रिंगरोड आला. पण मागच्या ५ वर्षांत रोडच्या आजूबाजूला शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या. सगळ्यांचा हिशोब होणार. मूळ मालक शेतकरीच!’ ही पोस्ट शेअर करत प्रवीण यांनी, ‘आता मोठमोठे अंगावर येतील. पण पर्याय नाही शेवटी मुळशीकर आहे. बोलावं तर लागणारच..’ असं कॅप्शन लिहिलं आहे. प्रवीण तरडे यांच्या या पोस्टवर अनेकांनी ‘मुळशी पॅटर्न २’ अशा कमेंट्स करत सिनेमाबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये प्रवीण तरडे यांनी मुळशी येथील जमिनींची विक्री आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचं चित्र केलं होतं. त्यामुळे आता प्रवीण यांच्या या पोस्टनंतर ‘मुळशी पॅटर्न २’ या सिनेमाची शक्यता वर्तवली आहे.
Pravin Tarde दिग्दर्शित देऊळ बंद २ ची टीम कोल्हापुरात, देवीला काय घातलं साकडं?
‘मुळशी पॅटर्न २’ बद्दल काय म्हणालेले प्रवीण तरडे?
एका मुलाखतीमध्ये ‘मुळशी पॅटर्न २’ बद्दल बोलताना प्रवीण तरडे म्हणाले होते की, ‘मुळशी पॅटर्न २’ मध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तुझ्या-माझ्या घराचं स्वप्न इतकं महाग का झालं? याचं उत्तर या चित्रपटातून मिळेल. ‘मुळशी पॅटर्न २ – तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट’ हेच चित्रपटाचं शीर्षक असेल. हा चित्रपट इतका खतरनाक असेल की, तो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल आणि शहारे येतील.’ ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न २’ बद्दल सांगितलेलं. Kushal Badrike : ‘शुटिंगदरम्यान प्रवीण तरडेंनी खरंच माझ्या कानशिलात लगावली’, कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा दरम्यान, प्रवीण तरडे यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा