Star Pravah Actor in Zee Marathi Tv Serial:मराठी छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. झी मराठी वाहिनीवरची कमळी ही मालिका सध्या चर्चेत आहे. आता या मालिकेत एका सुपरस्टार अभिनेत्याची चर्चा होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराची बरीच चर्चा झाली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे नेते चर्चेचा विषय ठरले. तसंच एखाद्या वाहिनीवरून कलाकार दुसऱ्या वाहिनीच्या मालिकेत दिसला तर प्रेक्षकांच्या भुवया उंचवतात अन् याची चर्चाही बरीच होते. आता मराठी छोट्यापडद्यावर असंच पक्षांतर होतंय. लोकप्रिय अभिनेता स्वगृही परतल्याचं म्हटलं जात आहे. झी मराठीच्या गाजलेल्या मालिकेतील स्टार अभिनेता पुन्हा बऱ्याच वर्षांनी आता एका लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे.
झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात सुपरहिट हिरोचा धमाकेदार कमबॅक, तुमचा अंदाज कमेंट्समध्ये नक्की सांगा…असं म्हणत एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यावरून नेटकऱ्यांनी या अभिनेत्याला ओळखलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून अभिनेता शशांक केतकर आहे.
होणार सून मी या घरची या गाजलेल्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला शशांक गेल्या काही वर्षात स्टार प्रवाहच्या वेगवेगळ्या मालिकेत झळकला . आता तो झी मराठीच्या कमळी या मालिकेत दिसणार आहे. यात तो एका युवा राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं पाहायला मिळतंय.यावर अद्याप शशांकनं प्रतिक्रिया दिली नाहीये. पण त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी त्याला कमबॅकसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी तो २०२१ मध्ये ‘पाहिले न मी तुला’ या झी मराठीच्या मालिकेत दिसला होता. Monika Dabade: आई झाल्यानंतर दोन महिन्यांतच शूटिंगला सुरुवात, ‘ठरलं तर मग’ फेम अस्मितानं सांगितलं खरं कारण
दरम्यान, ‘ स्टार प्रवाह ‘ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल चार वर्षे आणि १४०० हून अधिक भागांचा यशस्वी टप्पा गाठल्यानंतर ही मालिका संपली. मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्यासह सुलेखा तळवलकर, अभिजीत चव्हाण, निशाणी बोरुले आणि प्रतिमा कुलकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
‘कमळी’बद्दल कमळी या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका आहे.या मालिकेतील रंजक कथानक, भावनिक गुंतागुंत आणि नात्यांतील चढ-उतार प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. साध्या आणि कष्टाळू मुलीच्या प्रवासावर आधारित असलेल्या या मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तसंच टीआरपीच्या स्पर्धेतही मालिकेनं टिकून आहे. Ashwini Kasar: गावातले ते प्रसंग अभ्यासताना मीही हादरून गेले; ‘एक होतं माळीण’ सिनेमातील भूमिकेबद्दल अश्विनी कासारचा खुलासा मालिका सुरू झाल्यापासूनच यातील कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. मुख्य भूमिकेतील कलाकारांसोबतआता नवीन पात्रांच्या प्रवेशामुळे मालिकेचा टीआरपी आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
येत्या भागांमध्ये कमळी, ऋषी आणि अनामिका यांच्या नात्यात नेमके काय समीकरण पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा