Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रामायण सिनेमावरील टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘रामायण’चा टीझर प्रदर्शित होताच, अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. अनेक प्रेक्षकांनी टीझरचं कौतुक केलं, तर काहींनी रणबीर कपूरच्या निवडीवर टीका केली आणि तो या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं म्हटलं. ‘रिव्ह्यू नेशन’ला दिलेल्या मुलाखतीत, रणबीरनं या टीकेवर उत्तर देताना सांगितलं की, प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी कोणताही एक योग्य अभिनेता नाही असं त्याला वाटतं.
Actor Sudhir : अत्याचारामुळे दारूच्या आहारी गेलेल्या पत्नीचं वयाच्या 44व्या वर्षी निधन; एका भयानक घटनेनं बदललं सुप्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य
‘रामायण’ सिनेमाच्या टीकेवर रणबीरचं सडेतोड उत्तर
अलीकडेच, ‘रामायण’च्या टीमनं सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये हजेरी लावली. त्यांनी एका पॅनल चर्चेनं चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक मुलाखती दिल्या. प्रभू रामाची भूमिका मिळाल्यावर अभिनेत्याच्या मनात पहिला विचार काय आला, असं विचारलं असता रणबीर म्हणाला की, ‘माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न होता, ‘मी या भूमिकेसाठी पात्र आहे का? मी योग्य व्यक्ती आहे का?’ आणि मला ही जबाबदारी का दिली जातेय? केवळ प्रभू रामाची भूमिका साकारण्याचीच नव्हे, तर त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची?’
Kushal Badrike : ‘शुटिंगदरम्यान प्रवीण तरडेंनी खरंच माझ्या कानशिलात लगावली’, कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा
‘पण तुम्हाला लवकरच कथेचं महत्त्व, जबाबदारी आणि चित्रपट निर्मात्यांच्या चांगल्या हेतूंची जाणीव होईल. ही कथा आपल्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे, मला नाही वाटत की प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी कोणी एकच योग्य अभिनेता आहे.’ असंही रणबीरनं सांगितलं.
Kumar Sanu : ‘मला माझ्या जीवाची भीती वाटत होती’, दुबईत अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत कुमार सानूंनी केलेलं परफॉर्म; सांगितला अनुभव
रणबीर पुढे म्हणाला की, ‘ज्या प्रत्येकानं रामायण पाहिलं आहे, त्यांची प्रभू रामाबद्दल स्वतःची अशी एक समज आहे. त्यांची कोणतीही एक निश्चित प्रतिमा नाही. कदाचित बऱ्याच लोकांना वाटेल की माझी निवड चुकीची झाली आहे. काही लोक म्हणतील की माझी निवड अगदी योग्य आहे. पण सत्य हे आहे की, रामाच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेता तोच आहे, ज्याचा हेतू योग्य आहे आणि प्रभू रामाच्या प्रवासावर त्याची श्रद्धा आणि विश्वास आहे.’
Prashant Damle On Ashok Saraf : ‘अशोक सराफ यांच्याकडून कौतुक ऐकण्यासाठी १८ सिनेमे करावे लागले’, प्रशांत दामलेंनी सांगितला किस्सा
यशनेसुद्धा रणबीरनं साकारलेल्या प्रभू रामाच्या भूमिकेचं कौतुक केलं आणि म्हणाला की, ‘प्रभू रामाची भूमिका साकारणं सोपं नाही. रणबीर कपूरने ती भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे. त्यानं खूप मेहनत घेतली आहे आणि जेव्हा तुम्ही रामायण पाहाल, तेव्हा तुम्हाला रामाचं एक सुंदर चित्रण दिसेल’
नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत
दरम्यान, ‘रामायण’ सिनेमाबद्दल सांगायचं तर नितेश तिवारी दिग्दर्शित आणि यश व नमित मल्होत्रा सह-निर्मित, हा दोन भागांचा चित्रपट अंदाजे ४,००० कोटींच्या बजेटमध्ये बनवला जात असून आतापर्यंतच्या सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरनं प्रभू राम आणि प्रभू परशुराम या दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. सोबत साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होणार आहे.

