Headlines

Iran Bab el-Mandeb Strait Closure Threat; इराणची हुतींना हाक, आणखी एका ‘होर्मुझ’वर जगाच्या कोंडीची तयारी! किती देशांना फटका बसणार?


Bab el-Mandeb Strait: इराणने पुन्हा वाटाघाटी सुरू न केल्यास त्यांच्या ऊर्जा ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्यावर तेहरानकडून होर्मुझनंतर आता जगाचा आणखी एक ‘चोक पॉईंट’ बंद करण्याचा इशारा दिला गेला आहे. होय, पश्चिम आशियातील युद्धाची व्याप्ती आता होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पलीकडे जाऊन लाल समुद्रापर्यंत पोहोचली आहे.

इराणचा हुथींना ‘रेड सी’बद्दल अलर्ट

अमेरिकेने वीज नेटवर्कवर हल्ला केल्यास लाल समुद्राकडे जाणारे बाब अल-मंडेबचे प्रवेशद्वार बंद करावे, अशी इराणने येमेनच्या हौथींकडे मागणी केल्याचे अहवालातून समोर आले आहे. बाब अल-मंडेब सामुद्रधुनी लाल समुद्राला एडनच्या आखात आणि हिंद महासागराशी जोडते. आशिया आणि युरोप दरम्यानचा हा महत्त्वाचा व्यापारीजल मार्ग आहे, त्यामुळे होर्मुझप्रमाणे इथेही अडथळा आल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी मंदी येण्याचा धोका निर्माण होईल.

Maharashtra TimesGold Silver Price: अमेरिका-इराण संघर्षात सोन्या-चांदीचा बॅण्ड वाजला; गुंतवणूकदारांचं नुकसान, खरेदीदारांची चांदी; आजचा नवीन भाव काय?

इराणच्या धमकीनंतर तेलाच्या किमतीत वाढ

दरम्यान, इराणच्या धमकीनंतर क्रूडच्या किंमतीत 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ब्रेंट क्रूड तेलाचा दर 93 सेंट्सने (1.09%) वाढून 85.88 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला तर,WTI क्रूडच्या किमती 1.12% वाढून 80.49 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. इराणने येमेनच्या हौथी गटाला लाल समुद्रातील तेलमार्ग रोखण्याची तयारी करण्याचे निर्देश दिल्याचे रॉयटर्सच्या अहवालातून समोर आले आहे.

इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे आखातातील प्रमुख सागरी मार्गांना धोका निर्माण होण्याच्या भीतीमुळे तेलाच्या किमती वाढीचा कल दिसून येत आहे. चालू आठवड्यात आतापर्यंत ब्रेंट आणि WTI क्रूडची किंमत जवळपास 12 टक्क्यांनी वाढली आहे. यासह ब्रेंट सलग तिसऱ्या आठवड्यात चढता आलेख कायम ठेवला तर, WTI सलग दुसऱ्या आठवड्यात वाढीच्या मार्गावर आहे.

Maharashtra TimesShare Market मध्ये गेम फिरला! खरंच, AI चा फुगा फुटला? 2026 मध्ये 5 बड्या ‘क्रॅश’मुळे करोडो गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर

हुथी नेत्याचा इस्रायल-अमेरिकेला इशारा

अशा परिस्थितीत, लाल समुद्रातील बाब अल-मंडेबचे प्रवेशद्वार आणि होर्मुझ सामुद्रधुनी या दोन्ही मार्गांनी होणाऱ्या तेल पुरवठ्यात व्यत्यय आल्यास जगभरातील पुरवठा साखळ्यांवर प्रचंड ताण येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच जहाजांच्या विमा हप्त्यांमध्येही लक्षणीय वाढ होईल.

दुसरीकडे, इराणी क्षेत्रांवर अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यानंतर येमेनच्या हुथी नेत्यानेअमेरिका आणि इस्रायल जगात द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. सय्यद अब्दुल-मलिक अल-हुथीने अमेरिका आणि इस्रायलच्या हेतूंना प्रोत्साहन दिल्याबद्दल सौदी अरेबियाला जबाबदार धरले.

“अमेरिका आणि इस्रायल आंतरराष्ट्रीय करार आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा आदर करत नाहीत, उलट वंशसंहार व संस्कृतींच्या विनाशात गुंतले आहेत. सौदी अरेबिया मुस्लिम समुदायाला कमकुवत करण्यासाठी अमेरिका, इस्रायल आणि ब्रिटनला पाठिंबा देत आहे,” असे हुथी नेत्याने म्हटले.

अशाप्रकारे, जागतिक बाजारातील गुंतवणूकदार आता होर्मुझ आणि बाब अल-मंडेब सामुद्रधुनी, जगातील तेल वाहतुकीसाठी दोन सर्वात महत्त्वाच्या सागरी ठिकाणांजवळील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.

अमेरिका-इराणचे एकमेकांवर हल्ले

बुधवारी अमेरिकेने, गेल्या महिन्याच्या करारानंतर प्रथमच, एकाच दिवसात दोन मोठे हवाई हल्ले केले. यापैकी बहुतेक लक्ष्ये इराणच्या दक्षिण किनारपट्टीजवळ होते. तर, गुरुवारीही हल्ले सुरूच राहिले. प्रत्युत्तरात इराणने शेजारील देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले, ज्यात जॉर्डनमधील नुकत्याच विस्तारित केलेल्या हवाई तळाचाही समावेश होता.