Headlines

एका क्लिकवर FASTag चे स्टेटमेंट डाऊनलोड करा, टोल टॅक्सचा हिशोब ठेवा ऑनलाईन। Maharashtra Times


महामार्गावरून प्रवास करताना प्रत्येक वाहनधारकासाठी FASTag अनिवार्य झाला आहे. प्रवासाच्या खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी किंवा कंपनीकडे क्लेम करण्यासाठी अनेकदा फास्टॅग स्टेटमेंटची गरज भासते. युजर्स आता घरबसल्या त्यांच्या बँकेच्या अधिकृत ॲप किंवा सरकारी पोर्टलवरून अवघ्या काही मिनिटांत हे बँक स्टेटमेंट PDF स्वरूपात सहज डाऊनलोड करू शकतात. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

FASTag। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
फास्टॅग वॉलेटमधून किती पैसे वजा झाले, याची अचूक माहिती मिळवण्यासाठी स्टेटमेंट तपासणे गरजेचे आहे. एसबीआय, एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय सारख्या बँका आणि ‘माय फास्टॅग’ ॲपद्वारे ग्राहकांना ही ऑनलाईन सुविधा दिली जाते. ठराविक कालावधी निवडून वाहनधारक टोल टॅक्सचे संपूर्ण विवरण स्वतःच्या मोबाईलवर सुरक्षितपणे सेव्ह करू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती ही पुढे जाणून घेऊया.

SBI FASTag युजर्ससाठी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत फास्टॅग पोर्टलवर जाऊन तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरद्वारे लॉग-इन करा. तेथे ‘Transaction History’ किंवा ‘Statement’ या पर्यायात जाऊन हव्या असलेल्या तारखांचा कालावधी निवडा. त्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटमेंट PDF किंवा Excel फॉर्मॅटमध्ये डाऊनलोड करू शकता. (REF.)

HDFC FASTag युजर्ससाठी

युजर्सनी हॅशटॅग पोर्टलवर लॉग-इन करून ‘Statements’ अंतर्गत ‘Transaction Report’ वर क्लिक करावे. तिथे वाहन क्रमांक (Vehicle Registration Number) टाकून ‘Generate Statement’ वर क्लिक केल्यास सविस्तर अहवाल समोर येतो, जो एक्सपोर्ट (Export) करता येतो. (REF.)

ICICI FASTag युजर्ससाठी

बँकेच्या कस्टमर पोर्टलवर लॉग-इन करून ‘Reports’ सेक्शनमध्ये जावे. तेथून टोल नाक्याचे नाव आणि कट झालेले पैसे यासह संपूर्ण ‘FASTag History’ डाऊनलोड करता येते. (REF.)

‘My FASTag’ ॲप किंवा IHMCL पोर्टलद्वारे

IHMCL (Indian Highway Management Company Limited) च्या पोर्टलनुसार, जर तुमच्याकडे NHAI चा फास्टॅग असेल, तर IHMCL FASTag वेबसाईटवर जाऊन पासवर्ड किंवा OTP द्वारे लॉग-इन करा. ‘Transaction History’ वर जाऊन ठराविक कालावधी निवडून थेट पीडीएफ सेव्ह करा. (REF.)

ॲपवरून डाऊनलोड

My FASTag अधिकृत मोबाईल ॲपवरून लॉग-इन केल्यानंतर होम पेजवर ‘Transaction History’ चा पर्याय मिळतो. एकापेक्षा जास्त वाहने असल्यास संबंधित वाहन क्रमांक निवडून मागील सर्व व्यवहारांची नोंद पाहता व डाऊनलोड करता येते. (REF.)

डिजिटल पेमेंट ॲप्स (PhonePe, Paytm, Google Pay)

तुम्ही तुमचा फास्टॅग वरीलपैकी कोणत्याही यूपीआय (UPI) ॲपशी लिंक केला असेल, तर: संबंधित ॲपच्या ‘History’ किंवा ‘All Transactions’ सेक्शनमध्ये जा.

सर्च बारमध्ये ‘FASTag’ टाईप करा

तुम्हाला जुन्या सर्व रिचार्ज आणि पेमेंटच्या पावत्या (Receipts) मिळतील, ज्या तुम्ही स्क्रीनशॉट किंवा पीडीएफ स्वरूपात सेव्ह करू शकता.

कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी आणि चुकीचे पैसे वजा झाले नसल्याची खात्री करण्यासाठी युजर्सनी दरमहा आपले फास्टॅग स्टेटमेंट नियमितपणे तपासणे गरजेचे आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा