Headlines

रोहित शर्माचा लॉर्ड्सवर शेवटचा सामना? हिटमॅनला वगळत BCCIकडून मिशन वर्ल्ड कप 2027ची तयारी; जाणून घ्या


Rohit Sharma Last ODI in Lords : भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. लाडक्या हिटमॅनचा लॉर्ड्सवर अखेरचा वनडे सामना असल्याची माहिती समोर आली आहे. मिशन वनडे वर्ल्ड कपसाठी त्याला वगळत त्याच्या जाही दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यासाठी आग्रही आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या.

Rohit Sharma
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये इंग्लंड संघाने ४ विकेटने भारताचा पराभव केला. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने कमबॅक करत मालिका १-१ने बरोबरीत सोडवली आहे. हा सामना गमावल्यावर एक मोठी अपडेट समोर आली असून भारताची माजी कर्णधार रोहित शर्मा याचा लॉर्ड्सवरील सामना हा अखेरचा असल्याचं बोललं जात आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिजच्या मालिकेत रोहित शर्माला वगळून यशस्वी जयस्वालची संघात एन्ट्री करणार असल्याचं माहिती समोर आली आहे.

रोहित ४७ चेंडूंत एक चौकार व एक षटकारसह २६ धावा काढून बाद झाला. पहिल्या वन-डेत ३९ वर्षीय रोहित ११ धावांवर माघारी परतला होता. गेल्या आठ वन-डे सामन्यांमध्ये रोहितने ३०.१ च्या सरासरीने आणि ८८.६ च्या स्ट्राइक रेटने केवळ २४१ धावा केल्या असून, यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे सध्या दौऱ्यावर असणारे निवडकर्ते म्हणून कार्डिफमध्ये आहेत. दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा भारतीय कर्णधार रोहितचा पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपसाठी विचार केला जात नसल्याचे अगदी स्पष्ट आहे. त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra TimesGurnoor Brar : इंग्लंड मालिकेदरम्यान भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई, नेमकं काय घडलं? गुरनूरची प्रतिक्रिया काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माला निवृत्ती घेण्यास कोणीही भाग पाडू शकत नाही. मात्र, निवडकर्त्यांना आता संघाचं भविष्य घडवायचं आहे आणि त्याची सुरुवात सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. त्यामुळे रोहितच्या पुढील कारकिर्दीबाबतचा अंतिम निर्णय त्याच्याच हातात असेल. रोहित शर्माच्या जागी निवडकर्ते जयस्वाल याला जास्तीत जास्त संधी देण्याच्या विचारामध्ये आहेत. वर्ल्ड कपआधी भारत जवळपास २० वनडे सामने खेळणार आहे. वर्ल्ड कपआधी जयस्वालला अंधिक संधी मिळायल्या हव्यात अशी त्यांचा इरादा आहे.
Maharashtra TimesWashington Freedom vs MI New York : 267 धावांचं लक्ष्य 18.4 षटकांत पार; मुंबई इंडियन्सच्या संघाला विरोधी टीमनं पछाडलं, कॅप्टनचं 33 चेंडूतलं शतक वाया
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे मालिकेतील दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडने भारताला ४४ षटकांत २३३ धावांत रोखण्यात यश मिळवले. या लढतीत आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा चाचपडत खेळताना दिसला. सलग दुसऱ्या वन-डेत तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे त्याला वन-डे संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वात भारताने टी-२० वर्ल्ड कप २०२४ आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्माची इच्छा आहे की त्याला वर्ल्ड कप २०२७ खेळायचा आहे. मात्र आता त्याची ही इच्छा अपूर्ण राहते असं दिसत आहे.