जर तुमचे Driving Licence हरवले असेल तर आणि तुम्हाला डुप्लीकेट Licence हवे असेल तर इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. डुप्लीकेट Driving Licence बनवण्याची कोणतीही प्रोसेस नाही परंतू जर तुम्हाला ही प्रोसेस माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये सर्व डिटेल्स देणार आहोत.

FIR दाखल करा
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करावा जेणेकरून जर तुमचे लायसन्स परत मिळाले तर पोलिस ते तुम्हाला परत करतील आणि या एफआयआर कॉपीवरून तुम्हाला लायसन्सची डुप्लिकेट कॉपी मिळू शकेल.
जवळच्या RTO ऑफिसमध्ये जा
तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स ज्या आरटीओ (Regional Transport Office) मधून घेतला होता तिथे जा आणि यासंबंधी सर्व माहिती नोंदवा.
अर्ज भरा
तुम्हाला आरटीओकडून ” डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ” मिळविण्यासाठी एक अर्ज फॉर्म (फॉर्म एलएलडी) दिला जाईल, जो तुम्हाला सर्व कागदपत्रांसह भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.
कागदपत्रे तयार करा
या फॉर्मसोबत, तुम्हाला तुमच्या हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या एफआयआरची कॉपी, Identity Proof (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड), अॅडरेस प्रुफ(उदा. वीज बिल, रेशन कार्ड), पासपोर्ट साईज फोटो, आधीच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे डिटेल्स इत्यादी तिथे द्वावे लागेल जेणेकरून तुम्हाला डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स लगेच मिळू शकेल.
अर्ज भरुन झाल्यावर लगेच पैसे भरुन टाका
तुमच्या राज्यानुसार डुप्लिकेट लायसन्स मिळविण्यासाठी तुम्हाला किती शुल्क भरावे लागते याची माहिती तुम्हाला दिली जाते.
बायोमेट्रिक आणि व्हेरिफिकेशन
तुमची बायोमेट्रिक माहिती नोंदवण्याची वेळ आली आहे जिथे तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन तुमचा फोटो आणि फिंगरप्रिंट सारखी माहिती नोंदवावी लागेल आणि नंतर तुमचे कागदपत्रे तपासली जातील. यानंतर, तुमचा डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स एक ते दोन आठवड्यांत जारी केला जातो.

