Headlines

एकीकडे करार झाल्याचा दावा; दुसरीकडे इराणवर हल्ल्याची तयारी, ट्रम्प यांच्या दाव्यांवरून मोठा संभ्रम, युद्ध थांबणार की भडकणार? – donald trump war peace deal or escalation


Edited byManali Sagvekar|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

US-Iran Peace Deal: इराण युद्धाबाबात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार शेवटच्या टप्प्यात आल्याचा दावा केला असला, तरी इराण आणि अमेरिकन तज्ज्ञांनी हा दावा फेटाळल्याने भारतासह जगाचीही चिंता वाढली आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यांवरून मोठा संभ्रम
US-Iran War: अमेरिका आणि इराणमधील यद्ध एका अत्यंत संवेदनशील वळणार पोहोचले असून, गुरुवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण जग चक्रावून गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे युद्ध तात्काळ थांबून शांतता करार यशस्वी होत असल्याचा दावा ककरत आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थिती पाहता युद्धाचा धोका आधीपेक्षा कितीतरी पटीने वाढल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांच्या या परस्परविरोधी विधानांमुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

एकाच दिवसात दोन टोकाचे निर्णय

एकाच दिवसात दोन टोकाचे निर्णय

गुरुवारी सकाळी कमांडर-इन-चीफ डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खार्ग वेट या मुख्य तेल निर्यात केंद्रावर थेट लष्करी हल्ला करण्याची आणि तिथे घुसण्याची उघड धमकी दिली. हा लष्करी थरार झाला असता, तर अनेक अमेरिकन सैनिकांचे प्राण धोक्यात येऊ शकले असते आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असता. पण अवघ्या काही तासातच ट्रम्प यांनी ओव्हल कार्यलयातून अमेरिका आणि इराण यांच्यात एका सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब होणार असून, युद्ध थांबण्याच्या उंबरठ्यावर आहे. ट्रम्प यांनी हा करार थोडा विचार करायला लावणारा आहे असे म्हटले, ज्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यांना गांभीर्य नाही

ट्रम्प यांच्या दाव्यांना गांभीर्य नाही

दरम्यान, अमेरिकेच्या बायडेन प्रशासनात हवाई दलाचे सचिव राहिलेले फ्रँक केंडल यांनी सीएनसीएनशी बोलताना सांगितले की, ट्रम्प यांच्या या दाव्यांकडे फार गांभार्याने घेण्याची गरज नाही. हा युद्ध संपवणारा कोणताही अंतिम करार नाही. हा केवळ पुढील 60 दिवसांसाठी युद्धविराम वाढवण्याचा एक प्रयत्न असू शकतो, जेणेकरून इराणच्या अणू कार्यक्रमावर पुढील चर्चा करता येईल.

ट्रम्प यांचे दावे अविश्वासू

ट्रम्प यांचे दावे अविश्वासू

दुसरीकडे, अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे रिपब्लिकन नेते आणि फॉक्स न्यूज वृत्तवाहिनीचे विश्लेषक मार्क लेविन यांनीही ट्रम्प यांना घेरले आहे. ते म्हणाले, ‘जोपर्यंत हा करार अधिकृतपणे समोर येत नाही आणि पुढील 48 ते 72 तासात त्यावर स्वाक्षऱ्या होत नाहीत, तोपर्यंत ट्रम्प यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही.’

ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप

ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप

दरम्यान, इराणसोबत सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत 13 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर कोट्यवधि डॉलर्सची लष्करी शस्त्रे आणि विमान उद्ध्वस्त झाली आहेत. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अमेरिकन जनताच ट्रम्प यांच्या विरोधात जाऊ लागीली आहे. आता ‘माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी 2015 मध्ये इराणसोबत केलेला ऐतिहासिक अणू करार ट्रम्प यांनी 2018 मध्ये स्वतःच्या हट्टापायी मोडीत काढला होता. मग एवढे युद्ध करून, निष्पापांचे बळी घेऊन त्यांना काय मिळणार आहे?’, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारला जात आहे.

इराणने फोडला ट्रम्प यांचा फुगा

इराणने फोडला ट्रम्प यांचा फुगा

डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की, इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी या कराराला मंजुरी दिली आहे. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एस्माईल बघाई यांनी ट्रम्प यांचा हा फुगा फोडला. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेशी बोलताना बघाई म्हणाले की, ‘अमेरिकेकडून येणारे अहवाल केवळ तर्कवितर्क आहेत. इराणने अद्याप कोणत्याही कराराबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.

इराणच्या मागणीमुळे ट्रम्प अडचणीत

इराणच्या मागणीमुळे ट्रम्प अडचणीत

इराणची अर्थव्यवस्था आधीच अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांमुळे उद्ध्वस्त झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इराणने या चर्चेसाठी अमेरिकेसमोर एक मोठी अट ठेवली आहे. परदेशी बँकांमध्ये अडकलेले इराणचे अब्जावधी डॉलर्स तात्काळ मुक्त करावेत, अशी इराणची मागणी आहे. जर ट्रम्प यांनी इराणला पैसे दिले, तर त्यांच्यावर स्वतःच्याच देशात मोठी नामुष्की ओढवू शकते; कारण ट्रम्प यांनी भूतकाळात ओबामांवर इराणला पैसे दिल्याचा आरोप करत जोरदार टीका केली होती.

इस्रायलही ट्रम्प यांच्यावर नाराज

इस्रायलही ट्रम्प यांच्यावर नाराज

ट्रम्प यांनी हे युद्ध इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत मिळून सुरू केले होते. आता मात्र दोघांमधील संबंध ताणले गेले आहेत. ट्रम्प यांनी इस्रायलला लेबनॉनमधील हिजबुल्लाहवरील हल्ले मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे, जेणेकरून इराणसोबत करार करता येईल. नेतन्याहू यांनी म्हटले आहे की जोपर्यंत इराणचा अणू प्रकल्प पूर्णपणे नष्ट होत नाही आणि हिजबुल्लाहचा खात्मा होत नाही, तोपर्यंत इस्रायल शांत राहणार नाही.

भारतावर होणारे परिणाम

भारतावर होणारे परिणाम

इराण आणि अमेरिका यांच्यातला वाद भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओमानच्या खाडीतील समुद्री मार्ग बंद झाल्यास, कच्च्या तेलाचा पुरवठा बंद होईल आणि महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलची किंमत खूप वाढेल, यामुळे महागाई वाढेल. युद्ध वाढल्यास, मुंबई शेअर बाजार कोसळेल आणि गुंतवणूकदारांना खूप नुकसान होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिथे काम करणाऱ्या अनेक भारतीय आणि मराठी माणसांच्या सुरक्षेसाठी ट्रम्प यांचा शांततेचा दावा खरा ठरणे गरजेचे आहे.

Manali Sagvekar

लेखकाबद्दलManali Sagvekarमनाली सुनील सागवेकर या सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये डिजिटल विभागात कन्सलटंट म्हणून कार्यरत असून, त्या एक अनुभवी तरुण पत्रकार आहेत. विरार (पश्चिम) येथील विवा महाविद्यालयातून ‘मल्टीमीडिया आणि मास कम्युनिकेशन’ (BAMMC) या विषयात पदवी शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात स्वतःची ओळख निर्माण केली. सध्या मटा ऑनलाइनसाठी बिझनेस आणि आंतरराष्ट्रीय विषयक बातम्यांसाठी लेखन करत आहेत.मनाली यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात सकाळ मिडिया ग्रुपममधून केली. त्यानंतर ‘साम टीव्ही’च्या डिजिटल न्यूज रूममध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करताना त्यांनी चालू घडामोडींवर तसेच सविस्तर बातम्यांवर काम केले. डिजिटल माध्यमांसाठी लागणारा वेगवान मजकूर तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. ‘झी 24 तास’ सारख्या नामांकित संस्थेत राजकारण, महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विषयावरील बातम्या केल्या आहेत.मनाली यांना लेखनासोबतच तांत्रिक बाबींचेही उत्तम ज्ञान आहे. त्या VN आणि InShot सारख्या टूल्सचा वापर करून प्रभावी व्हिडिओ एडिटिंग करतात, तसेच त्यांना QuarkXPress आणि Google Workspace यांसारख्या आधुनिक कंटेंट मॅनेजमेंट टूल्सचाही सराव आहे.मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रगल्भता यामुळे त्या जागतिक स्तरावरील बातम्यांचे स्थानिक भाषेत अचूक रूपांतर करण्यास सक्षम आहेत. सोशल मीडिया ट्रेंड्सची जाण आणि वाचकांना गुंतवून ठेवणारी लेखनशैली ही त्यांची जमेची बाजू आहे. सातत्याने बदलणाऱ्या डिजिटल मीडियाच्या जगात विश्वासार्ह आणि संशोधनात्मक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून त्या आपल्या प्रगल्भ लेखनाने आणि विविध विषयांवरील पकडीने वाचकांशी संवाद साधत आहेत.आणखी वाचा