Headlines

Chakan Traffic Solution; High-Level Committee Formed by Shinde-Fadnavis


पुण्यातील चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरात गेल्या काही वर्षांत औद्योगिक विस्तार झपाट्याने झाला आहे. मात्र, वाहनांची वाढती संख्या, अवजड वाहनांची मोठी वर्दळ आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या वाहतूक क

.

उच्चस्तरीय समिती करणार उपाययोजना

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी हा केवळ स्थानिक नागरिकांचा नव्हे, तर येथील उद्योगांचाही कळीचा मुद्दा बनला आहे. या औद्योगिक पट्ट्यातून दररोज मोठ्या संख्येने कच्च्या मालाची वाहतूक करणारी अवजड वाहने, कामगारांच्या बसेस आणि खासगी वाहने ये-जा करतात. त्यामुळे महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर सतत मोठी वाहतूक कोंडी होते.

ही नव्याने स्थापन झालेली उच्चस्तरीय समिती रस्त्यांची सद्यस्थिती, वाहनांची वाढलेली संख्या आणि औद्योगिक परिसरातील वाहतूक नियोजनाचा एकत्रित अभ्यास करेल. केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी, परिसराच्या भविष्यातील औद्योगिक विस्ताराचा विचार करून दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबवण्यावर या समितीचा भर असणार आहे.

वाढत्या उद्योगांसाठीही मोठा निर्णय- उद्योग तक्रार निवारण कक्ष

वाहतूक कोंडीसोबतच प्रशासकीय लालफितशाहीचा फटकाही उद्योगांना बसत आहे. यावर तोडगा म्हणून सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

पुणे जिल्ह्यात वेगाने वाढणारे उद्योग आणि ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ (GCCs) लक्षात घेऊन, त्यांच्या प्रलंबित मंजुरी आणि परवानग्यांचे जलद निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे.

फायदा काय?

उद्योगांना विविध शासकीय विभागांकडून परवानग्या मिळवताना होणाऱ्या विलंबामुळे गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो. आता या स्वतंत्र कक्षामुळे उद्योजकांना त्यांच्या अडीअडचणी एकाच ठिकाणी (Single Window) मांडता येतील आणि त्यांचे जलद निराकरण करणे प्रशासनाला शक्य होईल.

पायाभूत सुविधांवर भर आणि भविष्यातील आव्हाने

चाकण आणि तळेगाव हा पुणे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा औद्योगिक पट्टा मानला जातो. या परिसरात मोठी परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक होत असताना, त्याला पूरक पायाभूत सुविधा (रस्ते, पाणी, वीज) निर्माण करणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या या दुहेरी निर्णयामुळे चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि उद्योजकांच्या प्रशासकीय अडचणी दूर होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता ही उच्चस्तरीय समिती आपले काम किती वेगाने सुरू करते आणि तक्रार निवारण कक्षाचा उद्योजकांना प्रत्यक्ष किती फायदा होतो, याकडे संपूर्ण उद्योग क्षेत्राचे आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा…

एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल!:चाकण दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याची मागणी, सरकारवर घणाघात

पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी, खड्डे आणि खराब रस्त्यांच्या दुर्दशेमुळे 2 लघुउद्योगांनी आपले उद्योग राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चाकणमधील खड्डे आणि पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि येथील परिस्थिती सुधारण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याची मागणी केली. याच दौऱ्यात शिवसेना (ठाकरे गट) आमदार बाबाजी काळे यांनी अचानक अर्ध्यातूनच काढता पाय घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत