फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
एखाद्या पगार वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर फार महत्वाचा घटक आहे. जर फिटमेंट फॅक्टरचा आकडा जास्त असेल तर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार आणि पेन्शनर्सला मिळणारी पेन्शनही त्यामानाने जास्तच असते. एकंदरीत, फिटमेंट फॅक्टर एक आकडा आहे ज्या दराने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाते. यंदाच्या फिटमेंट फॅक्टरसंदर्भातील चर्चेत आयोगात 3.833 हा आकडा मुख्य मुद्दा म्हंटला जात आहे. म्हणजे जर बेसिक पे 18,000 रुपये असेल तर त्यावर 3.833 या फिटमेंट फॅक्टरने कर्मचाऱ्याला एकूण 69,000 रुपयांपर्यंतची बेसिक पे वाढ मिळू शकते.
उदाहरणार्थ,
बेसिक पे 18,000 रुपये X फिटमेंट फॅक्टर 3.833 = बेसिक पे 68,994 रुपये
पेन्शन 9,000 रुपये X फिटमेंट फॅक्टर 3.833 = पेन्शन 34,500 रुपये
एक गोष्ट लक्षात घ्यावी, फिटमेंट फॅक्टरच्या 3.833 आकड्याची आयोगात सध्या चर्चा सुरू असून, या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आला नाहीये.
जर फिटमेंट फॅक्टर 3.833 लागू झाला तर..
जर आठव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 3.833 निश्चित केला तर बेसिक पे 18,000 हून थेट 69,000 चा आकडा गाठेल. पण ही रक्कम कर्मचऱ्याच्या हातात येणार वेतनाची रक्कम ठरेलच असं नाही. कारण बेसिक पे कर्मचाऱ्याच्या हातात येणारी पूर्ण रक्कम नसते. बेसिक पेच्या रक्कमेत इतर भत्ते जसे की महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच प्रवास भत्ताही जोडला जातो. त्यामुळे जर आयोगाने फिटमेंट फॅक्टर 3.833 लागू केला तर कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन 69,000 हूनही जास्त असू शकते.
एकंदरीत, कर्मचाऱ्याचे अंतिम वेतन हे पे Matrix, महागाईचा भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवासाचा भत्ता, कर्मचारी कोणत्या पे Level मध्ये आहे, कर्मचारी कोणत्या शहरात आहे तसेच इतर काही भत्ते यांच्या एकूण रक्कमेवर आधारित असेल.
अंतिम निर्णय कधी येणार?
आठव्या वेतन आयोगाकडून अंतिम निर्णय मे 2027 मध्ये येण्याची अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये आयोगाचे स्थापना करण्यात आली होती, तसेच अंतिम निर्णयासाठी त्यांना 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. त्या अनुषंगाने मे 2027 मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर, आठव्या वेतन आयोगाच्या या संपूर्ण चर्चेत कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचेही मुद्दे ऐकून घेतले जात आहेत.
परदेशी मालमत्ता लपवून ठेवणे पडणार महागात! अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी सरकारला द्यावी लागणार; FAST-DS योजना, सोप्या भाषेत समजून घ्यामहागाईच्या भत्त्यात होऊ शकतो बदल?
महागाई भत्ता म्हणजेच डीए हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पुरवला जातो. तर महागाई सवलत म्हणजेच डीआर पेन्शनर्सला पुरवण्यात येते. या भत्त्यांना शून्यापासून सुरू करण्यात येऊ शकते तसेच पुढे महागाईच्या दरानुसार ती पुढे वाढवण्यात येऊ शकते किंवा नवीन वेतनरचना लागू करताना महागाई भत्ता किंवा महागाई सवलत मर्ज किंवा रिसेट होण्याची शक्यता आहे. अद्याप या निव्वळ शक्यता असून सर्व बाबी सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होतील.

