Indian hockey team jersey colour controversy : भारतीय हॉकी संघांच्या जर्सीचा रंग बदलण्याच्या निर्णयावरील वाद वाढतच असून, ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला आहे.

तिर्की यांनी शब्द फिरवला
तिर्की यांच्यासह हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी झालेल्या या बदलाबाबत सहमती दर्शवली होती. हॉकीच्या लढती होणाऱ्या निळ्याटर्फशी रंगसाधर्म्य टाळण्यासाठी हा निर्णय झाल्याचे ते म्हणाले होते. ‘जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय कार्यकारी मंडळासमोर मांडायला हवा होता किंवा मला त्याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती; पण तसे झालेले नाही. मला ‘हॉकी इंडिया’च्या पदाधिकाऱ्यांकडून खुलासा हवा आहे. हा निर्णय कोणत्या आधारे घेण्यात आला, त्यासाठी कोणत्या प्रक्रियेचे पालन केले गेले आणि कोणत्या परिस्थितीत या निर्णयाला मंजुरी देऊन तो लागू करण्यात आला, हे मला ताबडतोब लेखी स्वरूपात सांगण्यात यावे,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी कार्यकारी मंडळाला पाठवलेल्या ‘ईमेल’ मध्ये म्हटले आहे.
Commonwealth Games 2026 : भालाफेकमध्ये भारताचा डबल धमाका, नीरज चोप्राचे रौप्य तर यशवीर सिंगला कांस्य; एका विक्रमी थ्रोने संपूर्ण गेम पालटला
‘ओडिशा सरकारने मला या मुद्द्यावर खुलासा मागितला आहे, त्यामुळे योग्य उत्तर देण्यासाठी मला आपल्याकडून (हॉकी इंडियाचे पदाधिकारी) खुलासा हवा आहे, असेही तिर्की म्हणाले. हॉकी इंडिया या निर्णयावर पुनर्विचार करेल का, या प्रश्नावर भोलानाथ म्हणाले, ‘मी एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला यावर चर्चा करावी लागेल. शेवटी, ही खेळाडू आणि प्रशिक्षकांची मागणी होती आणि आम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले.’
Commonwealth Games 2026 : फक्त एका किलोने हुकलं सुवर्ण, भाजी विक्रेत्याच्या नातवाने रौप्य पदकावर कोरलं नाव, कोण आहे लवप्रीतसिंग?
‘विनाकारण राजकीय रंग’
खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याच मागण्या लागू करण्यात आल्याचे ‘हॉकी इंडिया’चे सरचिटणीस भोलानाथसिंह यांनी सांगितले. ‘जर्सीचा रंग बदलण्याच्या निर्णयाबाबत ग्रुपमध्ये माहिती देण्यात आली होती, त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना याची कल्पना असायला हवी. हा एवढा मोठा मुद्दा बनेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. रंग बदलण्यासाठी आमच्यावर कुठूनही कोणताही बाह्य दबाव नव्हता. याला विनाकारण राजकीय रंग दिला जात आहे.’
Ajinkya Rahane : आणखी काय हवं! माझा सर्वात लाडका पार्टनर, अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर दिग्गजांच्या आभाळभर शुभेच्छा, यशाचा गाजावाजा न करणारा क्रिकेटपटू
कळते-समजते…
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणावरील वाद वाढताना पाहून तिर्की यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना जर्सीचा रंग बदलण्याबाबत बरेच प्रश्न विचारले. ‘हा मुद्दा बराच चर्चेत आला असून, त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. वर्ल्ड कप तोंडावर असल्यामुळे मी सार्वजनिकरीत्या सांगितले, की हा निर्णय खेळाशी संबंधित कारणांमुळे घेण्यात आला; जेणेकरून संघ आणि त्यांच्या तयारीवर लक्ष केंद्रित राहील,’ असे तिर्की म्हणाले.
जर्सीचा रंग बदलल्याची कोणतीही माहिती पदाधिकाऱ्यांना नव्हती आणि त्याबाबत त्यांचे मतही विचारात घेतले गेले नाही. हा बदल त्यांना सादरीकरणानंतरच कळला, असे कार्यकारी मंडळातील एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या आटीवर सांगितले.

