मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या आर्थिक फसवणूक,मानधन थकवणे यासारखे अनेक प्रकार समोर येत आहेत. अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीतल्याच कलाकारांकडून आर्थिक फसवणूक झाल्याचे अनुभव शेअर केले आहेत. मराठी सिनेइंडस्ट्रीतले लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनाही असे अनेक अनुभव आले. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या ‘सेलिब्रिटी कॉर्नर’ या विशेष मुलाखतीत त्यांनी असाच एक प्रसंग सांगितला.
काय म्हटलं महेश टिळेकर यांनी?
खरं तर मराठी सिनेविश्व हे एक कुटुंब असल्याचं म्हटलं जातं. बरीच कामं ही विश्वासावर , मैत्रीखातर केली जातात. पण यातूनच अनेकदा फसवणूकही होते. याबद्दल सांगताना महेश टिळेकर यांनी काही किस्से सांगितले.
इंडस्ट्रीत दिलेले पैसे, मदत केलेले पैसे कधीच परत मिळत नाहीत, फार क्वचित ठिकाणी ते परत मिळतात. मी तर हे आता सोडूनच दिलंय. एक सुपर डुपर निर्माता आहे. त्यानं तर माझ्या दिग्दर्शनाचे पैसेही नाही दिलेत. मी कॉन्ट्रॅक्ट न करता आतापर्यंत काम केलंय. शब्दालाही किंमत असते. कारण कॉन्ट्रॅक्ट करूनही पैसे बुडवणारेही खूप जण आहेत. माझ्या सोबत काम केलेल्या कोणालाही विचारा, महेश टिळेकरांनी पैसे थकवलेत का? प्रत्येकाचे मानधन वेळेत दिले जाते. खरं तर आर्टिस्टवर पैसे मागण्याची वेळच आली नाही पाहिजे, असंही टिळेकर म्हणाले.
विनोदी नटाने मागितले पैसे तसंच एक विनोदी नट आहे. त्याला मी कधी भेटलोच नाही.त्याचा अचानक फोन आला. ‘मी एका कार्यक्रमाला आलोय, त्यांनी मला चेक दिलाय. पण घरी जायला पैसे नाहीत, माझा मुलगा आजारी आहे. मला जरा अर्जंट मदत कराल का?’, मी त्याला म्हटलं करतो मदत. मी काही तरी कामात होतो. त्याचे लगेच फोनवर फोन, मेसेजवर मेसेज, सर पाठवले का पैसे. मी पण नंतर लगेच पैसे पाठवले.
पैसे पाठवल्यानंतर त्याचा साधा थॅक्यूचाही मेसेज आला नाही. तीन-चार महिन्यानंतर पुन्हा त्याचा फोन आला. तेव्हा तो फोनवर तेच सांगत होता. एका कार्यक्रमला आलोय, चेक दिलाय अन् पैसे नाहीयेत. तेव्हा टिळेकरांच्या लक्षात आलं की, काही तरी गडबड आहे. त्यांनी त्याला विचारलं की, तुला मलाच का मागावेसे वाटले पैसे, त्यावर तो म्हणाला की, माझा आतला आवाज सांगतोय की, तुम्ही मला मदत कराल.
पाहा संपूर्ण मुलाखत
नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत
‘तू मला मूर्ख बनवतोय’ तर त्या विनोदी नटाचं बोलणं ऐकल्यानंतर टिळेकरांनीही त्याला सुनावलं. माझाही आताला आवाज सांगतोय की, तू मला मूर्ख बनवतोय. मागच्या वेळी तुला पैसे दिले, तेव्हा साधं थॅक्यूही बोलला नाहीस. हा प्रकार आता तुझ्या नावासकट सोशल मीडियावर टाकणार असल्याचं टिळेकरांनी त्याला त्यावेळी म्हटलं होतं, पण त्यानं असं करू नका अशी विनंती केली होती. तेव्हा मी फोन कट केला… आजतागायत त्याने पैसे परत केले नाहीत, असंही टिळेकरांनी या मुलाखतीत सांगितलं.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा