Headlines

HFT 30 lakh Monthly Internship Offer; इंटर्न्सना 30-50 लाखांचा पगार, खास स्किलमुळे फ्रेशर्सना मिळतेय बंपर पगाराची ऑफर; पाहा गलेलठ्ठ पगार देणाऱ्या या कंपन्या कोणत्या?


Viral Claim : विनावेतन इंटर्नशिपचे दिवस आता संपले. हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग कंपन्या आता योग्य इंटर्न्सना आकर्षित करण्यासाठी विक्रमी मानधन देत आहेत. पण इतकी उदारता का?

कारकिर्दीची सुरुवात असो किंवा प्रमोशन… प्रत्येकाला आकर्षक पगाराची अपेक्षा असते. पण बहुतेक वेळा कर्मचाऱ्यांना तडजोड करावी लागते. मात्र, आपल्या देशात अशाही कंपन्या आहेत जिकडे कर्मचाऱ्याला पगारासाठी कधीच आणि कोणतीच तडजोड करावी लागत नाही.

सोशल मीडियात सध्या एक प्रकरण व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारतातील हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग – HFT – कंपन्या इंटर्न्सना आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम देऊ करत आहेत. शेअर बाजारातील मंदी आणि डेरिव्हेटिव्ह्जवरील कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर गणित आणि डेटा कौशल्ये असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांनी तरुणांसाठी तिजोरी उघडली आहे.

Maharashtra TimesGold Silver Duty Cut: सरकार सोनं चांदी स्वस्त करणार? एका निर्णयामुळे झटक्यात दर कमी होणार; सणासुदीला खरेदीची सुवर्ण संधी मिळणारयामुळे सोशल मीडियावर या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून तुम्ही इंटर्नशिपच्या शोधात असलेले विद्यार्थी असाल, तर तुम्ही हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग कंपन्यांमध्येही अर्ज करू शकता. वेगवेगळ्या कंपन्या एक ते तीन महिन्यांपर्यंत इंटर्नशिप देत आहेत.

इंटर्नशिपसाठी भारतीय कंपन्या देताहेत 30 लाख

ब्लूमबर्ग अहवालानुसार गुडगावस्थित कंपनी Quadeye इंटर्नना दरमहा सुमारे 30 लाख रुपये देत आहेत. म्हणजे एका विद्यार्थ्याला दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी 60 लाख रुपये मिळत आहेत, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास चौपट जास्त आहे. या दरम्यान, ग्रॅव्हिटॉन रिसर्च कॅपिटल दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी पूर्वीच्या 16 लाखांवरून सुमारे 50 लाख रुपये देत आहे.

Maharashtra TimesGold Silver Price: सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम; सणासुदीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशाला झळ, हौस पूर्ण करण्याची हीच का वेळ?ग्लोबल HFT कंपन्यादेखील ऑफर्स वाढवत असून ॲमस्टरडॅम-स्थित IMC ट्रेडिंग BV ने आपले दोन महिन्यांचे इंटर्नशिप पॅकेज दुप्पट करून सुमारे 50 लाखांवर वाढवले आहे, तर ऑप्टिव्हर होल्डिंग BV सुमारे 60 लाख रुपयांची ऑफर देत आहे.

कंपन्या कोण-कोणत्या तरुणांच्या शोधात

या कंपन्या केवळ स्टॉक्सची समज किंवा आर्थिक विवरणपत्रे वाचू शकतात अशा विद्यार्थ्यांच्या शोधात नाही तर, अशा संख्यात्मक प्रतिभेच्या शोधात आहेत जे गणित, सांख्यिकी आणि संगणक प्रोग्रामिंगचा वापर करून अशी मॉडेल्स तयार करू शकतील, जी व्यापारासंबंधी निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरतील.

ॲक्वीस सर्च या भरती कंपनीचे भागीदार डॅनियल वाझ म्हणतात की, परदेशी कंपन्या आता थेट महाविद्यालयीन कॅम्पसमधून प्रतिभावान उमेदवारांची भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. कंपन्या बाहेरून अनुभवी उमेदवारांची भरती करण्याऐवजी नवीन अभियंत्यांना संस्थेमध्येच प्रशिक्षण देण्यास अधिकाधिक पसंती देत असल्याचे त्यांनी पुढे म्हटले.

Maharashtra TimesFixed Deposit: ऐका हो, FD करायची घाई करू नका; छोट्या-छोट्या गोष्टी ठरतात नुकसानदायी, अडकेल तुमच्या मेहनतीची कमाई

इंटर्न्सना इतका पैसा देण्याचे कारण काय

याव्यतिरिक्त, शेअर बाजाराने गुंतवणूकदारांचा विश्वास गमावला असून किरकोळ गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने लागू केलेल्या नियामक निर्बंधांमुळे डेरिव्हेटिव्ह्जच्या उलाढालीत मोठी घट झाली. भारतातील डेरिव्हेटिव्ह्ज बाजारातील नियम अधिक कडक झाले आणि व्यापारात घट झाली असताना ही भरती मोहीम सुरू झाली आहे. याआधी जुलैमध्ये NSE वर फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग 17 महिन्यांतील नीचांकीवर घसरला होता, तर ऑगस्टच्या एका अहवालानुसार मार्चमध्ये संपलेल्या वर्षात या कंपन्यांच्या नफ्यात 3% घट झाली.

तरीही भारतीय ट्रेडिंग कंपन्या आता इतर देशांतर्गत बाजारांमध्ये प्रवेश करत असून यासाठी कुशल अभियंत्यांची कंपन्यांना गरज आहे. डॅनियल वाझ म्हणतात की, कंपन्यांना मिड-लेव्हल पदांसाठी परदेशातून चांगले उमेदवार मिळत नाहीत, त्यामुळे सुरुवातीपासून जास्त पगारावर प्रतिभावान लोकांना नोकरीच्या संधी देत आहेत.