Heavy rain in pune red alert from imd more rain expected in the next two days; पुण्यात दमदार पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस आणखी जोर वाढणार, IMD कडून अलर्ट जारी
Heavy rain in pune red alert from imd more rain expected in the next two days; पुण्यात दमदार पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस आणखी जोर वाढणार, IMD कडून अलर्ट जारी
Pune Rain News: पुढील दोन दिवस दुपारपर्यंत आकाश मुख्यतः ढगाळ राहील आणि दुपारनंतर पाऊस पडणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.
rain alert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यातही जोरदार आणि घाट माथ्यावर काही भागात मुसळधार पाऊस पडला. पुढील दोन दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. घाट माथ्यासाठी रेड ॲलर्ट जाहीर करून जोरदार आणि अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात सध्या मान्सून सक्रिय झाला आहे. पुण्यात तीन दिवस सलग पाऊस पडतो आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सरींमुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. रात्री हवेत गारवा जाणवत आहे.
शहरात गुरुवारीदेखील सकाळपासूनच ढग दाटून आले होते. काही वेळासाठी हलक्या सरीही बरसल्या. दुपारपर्यंत वारेही सुटले होते, एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून एखादी मोठी सर आणि हलक्या सरी रात्री उशिरापर्यंत पडत होत्या. पावसामुळे संध्याकाळी वाहतूक संथ झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट होऊन दिवसभरात कमाल २७.२ आणि किमान २२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रात्री साडेआठपर्यंत ११ मिलिमीटर पाऊस पडला. रात्री नऊनंतर पावसाचा जोर वाढला होता. शहरातील अनेक भागांत वाहतूक व्यवस्था संथ गतीने सुरू होती. गुरुवारी शहराचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस; तर किमान तापमान २१.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
दरम्यान, लोणावळा खंडाळ्यासह मावळात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडला. गुरुवारी २४ तासांत ११३ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. धबधबे आता खळाळून वाहायला लागल्याने पर्यटकांच्या गाड्या आता लोणावळ्याच्या दिशेने वळायला लागल्या आहेत; तर महिनाभर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मावळातील शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे. या हंगामात लोणावळ्यात ५८६ मिलिमीटर पाऊस पडला असून, गेल्या वर्षी याच काळात सुमारे २०६१ मिलिमीटर पाऊस पडला होता.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा