Headlines

Gold Silver Import Duty Cut; सरकार सोनं चांदी स्वस्त करणार? एका निर्णयामुळे झटक्यात दर कमी होणार; सणासुदीला खरेदीची सुवर्ण संधी मिळणार


Gold Silver Duty Cut: 13 मे 2026 रोजी सोने आणि चांदीच्या आयात शुल्काबद्दल घेतलेल्या निर्णयावरून केंद्र सरकार युटर्न घेऊ शकते. सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच सोनं पुन्हा एकदा रंगात आलं आहे आणि अलीकडच्या दरवाढीने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. सणासुदीच्या तोंडावर या दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी सरकार पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या आयात शुल्काला कात्री लावण्याचा विचार करत आहे.

सोने-चांदीवरील आयात शुल्काला कात्री लागणार?

यावर्षी मे 2026 महिन्यात सोने आणि चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून होणाऱ्या आयातीवर 15% पर्यंत शुल्काचा बोजा वाढवला होता. पण सणासुदीच्या दिवसांतील वाढती मागणी लक्षात घेऊन सरकार आता पुन्हा आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, शुल्क कमी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण, शुल्क कमी केल्याने सोन्याची तस्करी कमी होऊ शकते का आणि औपचारिक मार्गांनी अधिक आयातीला प्रोत्साहन मिळू शकते का, याबाबत सरकारमधील एक गट तपास करत आहे.

Maharashtra TimesFixed Deposit: ऐका हो, FD करायची घाई करू नका; छोट्या-छोट्या गोष्टी ठरतात नुकसानदायी, अडकेल तुमच्या मेहनतीची कमाई

सोने-चांदीवरील आयात शुल्क

पश्चिम अशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या परिणामी सरकारचा डॉलरमधील खर्च वाढला. अशा परिस्थितीत, परकीय चलन वचवण्यासाठी सरकारने सोन्या-चांदीवर आयात शुल्क वाढवले तसेच पंतप्रधान मोदींनी देखील मौल्यवान धातूंची खरेदी कमी करण्याचे आवाहन केलेले ज्याला जनतेने चांगला प्रतिसाद दिला.

पण, महाग सीमाशुल्क किंवा आयात दरांमुळे अनधिकृत मार्गांनी तस्करी वाढली ज्याच्यावर अंकुश मिळवण्यासाठी आता सरकार ॲक्शन घेण्याची तयारी करत आहे. सोन्या-चांदीवरील शुल्क कमी करून आणि सरकारी महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांना कायदेशीर मार्गांनी अधिकृत आयात करण्यास प्रोत्साहित करून तस्करीला आळा घालणे यामागील उद्देश असल्याने मनीकंट्रोलने सांगितले.

Maharashtra TimesUS Sanctions on Iran Explained: अमेरिकेचा इराणशी वैर अन् धग भारताला, भारताच्या तांदूळ, चहा, औषध निर्यातीला धोका; ट्रम्प यांनी खेळला आर्थिक नाकेबंदीचा डाव

भारतातील दरवर्षी सोन्या-चांदीची आयात

भारत जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आयातदारांपैकी असून दरवर्षी अंदाजे 700-800 टन सोन्याची आयात करतो तर युएई, थायलंड आणि सिंगापूरसारख्या देशांना सोन्याच्या दागिन्यांची निर्यातही करतो. यावर्षी एप्रिल महिन्यात, आयात शुल्क वाढ करण्याआधी, सोन्याच्या आयातीत मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे 82% वाढ झाली.

अशा परिस्थितीत, मध्यपूर्वेतील संकटाच्या काळात आयातीमधील वाढ चिंतेचे कारण बनलेली. वाढत्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर दबाव आला, चालू खात्यातील तूट वाढली आणि रुपयावर दबाव वाढला परिणामी सरकारने ॲक्शन घेऊन आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या काळातील दबाव काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला. मे महिन्याच्या मध्यापर्यंत रुपया वार्षिक तुलनेत आधीच 6% पेक्षा जास्त आपटला होता.

Maharashtra TimesSatya Nadella Salary: तुम्ही मंदी, AI च्या चर्चा करत राहा; मायक्रोसॉफ्टच्या सीओंनी उचलला 1 हजार कोटींचा पगार! एवढा पैसा आला कुठून?

कमी आयात शुल्कामुळे काय बदलणार?

उद्योग प्रतिनिधींच्या माहितीनुसार कमी शुल्कामुळे कायदेशीररित्या आयात केलेले सोने आणि अनौपचारिक मार्गांनी देशात आणलेल्या सोन्याच्या किमतीतील फरक कमी होऊ शकतो, ज्यामुळे तस्करी कमी होऊ शकते. याशिवाय उच्च शुल्क दरांमुळे करचुकवेगिरी आणि तस्करीतून मिळणारा नफा वाढतो, ज्यामुळे काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळते. सोने आणि चांदीच्या तस्करीत त्यावरील सरकारचे एकूण सीमा शुल्क शून्यावर आणले जाते.

उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार मौल्यवान धातूंवरील शुल्कवाढीमुळे तस्करीमध्ये लक्षणीय वाढ झाली. “सरकारला डॉलर वाचवायचे आहेत, पण समांतर अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डॉलर देशाबाहेर जात होते. कर बदलामुळे केवळ कायदेशीररित्या किती सोने आयात केले जाते, यातच बदल झाला आहे,” असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही पण केंद्र सरकार चांदी आणि प्लॅटिनमबाबतीतही या मुद्द्यावर विचार करत असल्याचे समोर आले आहे. मौल्यवान धातूंवरील आयात शुल्काबाबत चर्चा सुरू असली तरी कोणत्याही संभाव्य बदलांचे स्वरूप, वेळ आणि व्याप्ती अद्याप निश्चित व्हायची आहे, असे सूत्राने सांगितले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत