Headlines

Vidit Aatrey Success Story; IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसाय बुडाला; मग ॲमेझॉन अन् फ्लिपकार्टला घाम फोडून उभारला 95 हजार कोटींचा बिझनेस

Vidit Aatrey Success Story: सरकारी नोकरी करणाऱ्या पालक आणि मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आल्यामुळे विदितने पारंपरिक करिअरची निवड करणे स्वाभाविक बाब होती. मात्र, IIT मधील काळात विदित आत्रेयचा करिअरच्या नवीन संधींशी आणि विस्तारणाऱ्या स्टार्टअप परिसंस्थेशी परिचय झाला. आयआयटीनंतर आत्रेय यांनी ITC आणि InMobi या कंपन्यांमध्ये काम केले.

Vidit Aatrey Meesho Success Story
Success Story: देशातील सर्वात प्रतिष्ठित शिक्षण संस्था, IIT दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जिथं बहुतेक तरुण परदेशात जाण्याचे किंवा मल्टी-नॅशनल कंपन्यांमध्ये बक्कळ पगाराचे स्वप्न पाहतात, तिथं एका तरुणाने देशातील सर्वात कठीण मानली जाणारी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. पण, अनेक महिने पुस्तकांमध्ये रमून आणि कठोर परिश्रम करूनही स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी सुरू केली पण, स्वतःची कंपनी सुरू करण्याची तळमळ कायम मनात होती.

अपयश येऊनही खचला नाही अन् उभारली कोट्यवधींची कंपनी

अपयश येऊनही खचला नाही अन् उभारली कोट्यवधींची कंपनी

मग काय, नोकरी सोडली अन् एक स्टार्टअप सुरू केला. पण दुर्दैवाने पहिला व्यवसाय काही महिन्यांतच सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर आणखी एक धक्का बसला पण, त्याने हार मानली नाही आणि आपल्या चुकांमधून शिकून नवीन मार्ग अवलंबला. आपल्या भूतकाळातील घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे 95000 कोटींची मोठी ई-कॉमर्स कंपनी उभी केली, जी आज ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या जागतिक कंपन्यांनाही कडवी टक्कर देत आहे.

IIT ते मीशोपर्यंत प्रवास

IIT ते मीशोपर्यंत प्रवास

स्वप्न अन् अपयशाच्या या टप्प्यातून विदित आत्रेने यशाचा इतिहास घडवला, जे भारतातील सर्वात लोकप्रिय सोशल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘मीशो’चे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. 2012 मध्ये विदितने आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी ITC मध्ये रुजू झाले आणि त्यानंतर लाइमरोड या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये सामील झाले, जिथे त्याला भारतीय ई-कॉमर्स उद्योगाची सखोल माहिती मिळाली.

अपयशातून धडा घेतला

अपयशातून धडा घेतला

विदितने परदेशी कंपन्यांचे अनुसरण करण्याऐवजी भारतातील लहान शहरांमध्येव्यवसाय कसा चालतो? हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. 2015 मध्ये विदितने आणि त्याचा आयआयटीमधील सहकारी संजीव बर्नवालने स्थानिक दुकानांमधील कपडे ऑनलाइन विकण्याच्या उद्देशाने फॅशनिअर नावाचे हायपरलोकल फॅशन ॲप सुरू केले, पण योग्य व्यवसाय मॉडेलचा अभाव आणि ग्राहकांच्या थंड प्रतिसादामुळे उपक्रम काही महिन्यांतच बंद पडला.

मिशोचा जन्म कसा झाला

मिशोचा जन्म कसा झाला

सुरुवातीच्या अपयशाने खचून जाण्याऐवजी विदित आणि संजीव यांनी जमिनीवरील वास्तवाचे पुनर्मूल्यांकन केले. या दरम्यान, त्यांच्या लक्षात आले की भारतातील लहान शहरांमधील गृहिणी आणि छोटे दुकानदार व्हॉट्सॲप व फेसबुकच्या माध्यमातून कपडे आणि वस्तूंची रिसेल करायचे. ही कल्पना मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी डिसेंबर 2015 मध्ये मीशो (मेरी शॉप) चा पाया घातला आणि असे व्यासपीठ तयार केले, जिथे कोणीही शून्य गुंतवणुकीत आपला स्वतःचा resale व्यवसाय सुरू केला.

सिलिकॉन व्हॅलीतून मिळाले यश

सिलिकॉन व्हॅलीतून मिळाले यश

2016 मध्ये मीशोच्या आकर्षक कार्यपद्धतीला ओळखून प्रसिद्ध अमेरिकन सिलिकॉन व्हॅली ॲक्सिलरेटर, Y Combinator ने मीशोची mentorship program साठी निवड केली. त्यावेळी भारतातून निवड झालेल्या मोजक्या स्टार्टअप्सपैकी मीशो एक होता आणि त्यानंतर मीशोने मागे वळून पाहिले नाही. कंपनीच्या व्यवसाय मॉडेलने प्रभावित होऊन सॉफ्टबँक, मेटा, प्रोसस आणि सेक्वोया यांसारख्या आघाडीच्या जागतिक गुंतवणूकदारांनी लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली.

मिशोच्या यशाची प्रमुख रणनीती काय?

मिशोच्या यशाची प्रमुख रणनीती काय?
• एकीकडे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टने मोठ्या महानगरांमधील श्रीमंत ग्राहकांना लक्ष्य केले, तर मीशोने छोटी शहरे, गावे आणि ग्रामीण भारतातील मध्यमवर्गाला लक्ष्य केले.
• मिशोने छोट्या दुकान किंवा विक्रेत्यांकडून कोणतेही कमिशन न आकारणीचे क्रांतिकारक धोरण अवलंबले, ज्यामुळे कमिशनच्या भीतीमुळे ऑनलाइन बाजारात येण्यास संकोच करणारे लाखो छोटे दुकानदार मीशोमध्ये सामील झाले.
• मीशोने लाखो घरगुती गृहिणींना resaleद्वारे कमाईचे व्यासपीठे उपलब्ध करून दिले, ज्यामुळे तळागाळापर्यंत ब्रँडची तोंडी प्रसिद्धी झाली.

95,000 कोटींचे साम्राज्य

95,000 कोटींचे साम्राज्य

अशाप्रकारे, आजच्या काळात मिशो केवळ रिसेलिंग ॲप नाही, तर मोठे डायरेक्ट-टू-कन्झ्युमर – D2C – ई-कॉमर्स मार्केटप्लेस बनले आहे. मिशोवर वार्षिक 15 कोटी सक्रिय व्यवहार वापरकर्ते असून मिशो देशातील 80% पेक्षा जास्त पिन कोडवर डिलिव्हरी करते. यासह कंपनीने 95000 कोटींहून अधिक मूल्यांकन प्राप्त केले आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा