Headlines

E20 Ethanol Blending For Petrol | टाकीत मुंग्या! गाड्या बंद पडणार? E20 इथेनॉलचं भविष्य – e20 ethanol blending for petrol and contradiction nitin gadkari decision


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या इंधनाला कायदेशीर मान्यता देण्यात आलीय… म्हणजेच काय तर केंद्र सरकारच्या धोरणांनुसार येत्या काही वर्षांत देशातील दुचाकी आणि चारचाकी वाहनं सु सुसाट धावणार आहेत. मात्र याच एका घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले… कुणी पेट्रोल पंपावर जात बॉटलमध्ये पेट्रोल भरल्यानंतर ज्यात भेसळ असल्याचं म्हणतंय तर कुठे चारचाकी गाडीच्या इंधन भरण्याच्या झाकणजवळ असंख्य मुंग्या चिकटल्याचा व्हिडीओ पोस्ट करताय. हे व्हिडीओ पाहिल्यावर काही क्षणासाठी डोक्यात मुंग्या येतील आणि भविष्यात सरकारच्या अशा धोरणांमुळं काय होणार अशीच चिंता करत बसाल. ई-२० पेट्रोल सुरू झाल्यापासून, इथेनॉल मिश्रणामुळे इंजिन निकामी होणे किंवा वाहन बंद पडणे आणि वाहन धारकाच्या वाहनाचा विमाही रद्द होऊ शकतो अशा काही बातम्या समोर आल्या… त्यातच उसाचा रस थेट पेट्रोलमध्ये मिसळला जात असल्याचा दावा काही लोकांनी केला… त्यामुळं सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ खरे आहेत का…त्यातील दावा सत्य आहे का… ई-२० च्या वापरानं वाहनांचं मायलेज मोठ्या प्रमाणात कमी होणार का… इंजिन निकामी होण्यासोबतच, ईथेनॉलला खरंच मुंग्या आकर्षित होतात आणि ई-२० च्या वापरानं कंपन्या वाहनांचा विमा रद्द करणार का … अशा सर्व तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत