Shiv Sena Case Hearing : आयोगाचा निर्णयच चुकीचा ठासून सांगितलं, सिब्बलांची कोर्टात मोठी मागणी – shiv sena party and symbol case kapil sibal argument 13 august
Shiv Sena Case Hearing : आयोगाचा निर्णयच चुकीचा ठासून सांगितलं, सिब्बलांची कोर्टात मोठी मागणी – shiv sena party and symbol case kapil sibal argument 13 august
#shivsena #KapilSibal #UddhavThackerayशिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या खटल्याची सलग पाचव्या दिवशी सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे मूळ नाव ‘शिवसेना’ तसेच ‘धनुष्य-बाण’ हे अधिकृत चिन्ह शिंदे गटाला दिलं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.आधी झालेल्या सुनावणीतही ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. आज पुन्हा कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत थेट एकनाथ शिंदे च्यावर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर निशाणा साधला. “जे आमदार दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर होते, केवळ आमदारांच्या संख्येच्या जोरावर त्याच व्यक्तीला राज्याचं मुख्यमंत्रिपद बहाल करण्यात आलं!” असा रोखठोक दावा करत सिब्बलांनी कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाची अगदी चिरफाड केली. एवढेच नाही तर, लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी मागणी सिब्बलांनी आज न्यायालयात केली. कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंवर कोणता आणि कसा निशाणा साधला? निवडणूक आयोगाचा निकाल मूळातच कसा चुकीचा होता, यावर सिब्बलांनी काय युक्तिवाद केला? आणि सिब्बल यांनी कोणती मागणी सर्वोच्च न्यायालयात केलीये तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया..