Headlines

Dhule Mohadi 18 Year Old Minor Girl Dies due to Overdose of Abortion Pills; रक्तदाब कमी झाला, अचानक झटके आले, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू


Dhule Crime News : राज्यात रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अशातच धुळ्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळे एका अल्पवयीन १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

Dhule Abortion Pills Overdose Girl Death
धुळे गर्भपात गोळ्या ओव्हरडोस तरुणीचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : गर्भपात करण्याच्या उद्देशाने गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिसेवनाने एका अविवाहीत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली आहे. सदर तरुणी अविवाहित असल्याचं समोर येत असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मोहाडी नगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन १८ वर्ष ८ महिने वयाच्या तरुणीचा काल दुपारच्या सुमारास अचानक रक्तदाब कमी होत झटके येऊन ती बेशुद्ध झाली. तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी देवपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी सदर तरुणीस तपासले असता ती २४ आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती तिच्या कुटुंबाला दिली.

गर्भनिरोधक गोळ्यांचं अतिसेवन

गर्भधारणा करण्याच्या उद्देशाने गर्भनिरोधक गोळ्यांचं अतिसेवनझाल्यानं तिला हा त्रास होत असल्याचं सांगत तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सदर तरुणीला हिरे रुग्णालयात दाखल केलं असता तिच्यावर उपचार सुरु असताना रात्री १२.१५ वाजेच्या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणी मोहाडी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पीएसआय नितीन कारंडे करत आहेत.

Maharashtra TimesAshok Kharat Case: खरातचा पाय खोलात! पुत्रप्राप्तीच्या दाव्यातून अत्याचार, चौथ्या गुन्ह्यात पाच दिवस पोलिस कोठडी

कुटुंबीयांचे होणार जबाब

घटनेबद्दल गांभीर्याने तपास केला जातो आहे. त्यासाठी पीडित तरुणीचे कुटुंबीय व मैत्रिणी यांच्याकडेही चौकशी केली जाणार आहे. शिवाय वैद्यकीय अहवालही मागवण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपासाची पुढील दिशा ठरणार असल्याचं मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सांगितलं.

आंब्यांचं आमिष दाखवून अत्याचार

पुण्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आंब्याचे आमिष दाखवत अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी 47 वर्षीय विजय पोपट भोसले याला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

Maharashtra TimesTrimbakeshwar Temple : व्हीआयपी दर्शनाचा रेट तब्बल 12 हजार; भाविक रांगेत अन् लुटीचा मोठा डाव, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला अटक, पुतण्यांच्या मदतीने चालवायचा रॅकेट

सविस्तर माहितीनुसार, आरोपी विजय भोसले हा काळेवाडी परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. याच परिसरात पीडित चिमुरडीचं कुटुंबही राहतं. सोमवारी दुपारी पीडित चिमुरडी तिच्या दोन बहिणींसोबत घराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपीने आंबा देण्याचं आमिष दाखवत तिन्ही मुलींना जवळ बोलावलं. त्यानंतर दोन मुलींना बाहेर पाठवून, अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा