Headlines

Dhule Man Woman Found Dead at Shivarya Dongar sparks relationship rumors Crime News; 18 वर्षीय तरुणी आणि 23 वर्षीय तरुणाचा एकाच ठिकाणी संशयास्पद शेवट, महाराष्ट्रात खळबळ, अरुणने मध्यरात्री मेसेज केला अन् आक्रित समोर


धुळे : साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरातील शिवाऱ्या डोंगर येथे १८ वर्षीय तरुणी आणि २३ वर्षीय तरुणाची बॉडी एकाच ठिकाणी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पल्लवी अभिमन बहिरम (वय १८, रा. वडपाडा, शेंदवड) आणि अरुण जेजीराम चौरे (वय २३, रा. मोहगाव, शेंदवड, ता. साक्री) अशी मृतांची नावे आहेत.

पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ५३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १९४ अन्वये नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पीएसआय शिरसाठ करीत आहेत.

तरुणी रात्री घरातून बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातराहणारी १८ वर्षीय पल्लवी अभिमन बहिरम ११ ऑगस्टच्या रात्री कुटुंबीयांसोबत जेवण झाल्यानंतर घरात झोपली होती. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ती घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला.

त्याच दरम्यान २३ वर्षीय अरुण जेजीराम चौरे याने एका व्यक्तीला मध्यरात्री संदेश पाठविल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी शिवाऱ्या डोंगर परिसरात शोध घेतला असता दोघेही गंभीर अवस्थेत आढळून आले.

रुग्णालयात मृत घोषित

ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पिंपळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांना ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी दुपारी ४.३० वाजता दोघांनाही मृत घोषित केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.

Maharashtra TimesSonali Gaikwad : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू, महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्य संपवलं, चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र हरपलंया घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनास्थळाचा पंचनामा, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

तपासाला वेग, मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

एकाच ठिकाणी दोघा जणांचे शव आढळून आल्याच्या या घटनेने शेंदवड परिसर हादरला आहे. दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण काय होते आणि या घटनेपूर्वी नेमके काय घडले होते, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.

साडेचारशे विद्यार्थ्यांचे मृत्यू

दरम्यान, राज्यातील शासकीय आणि अनुदानित अशा हजाराहून अधिक आश्रमशाळांवर गेल्या पाच वर्षांत तब्बल सहा हजार २१८ कोटींचा निधी खर्च होऊनही मृत्यूचे तांडव थांबत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांतच ४५६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये २५६ मृत्यू झाले असून, त्यातही नाशिक अपर आयुक्तालयाअंतर्गत २२१ आदिवासी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Maharashtra TimesBengaluru Accident : मित्रासोबत बाईकने जाताना पडली, 32 वर्षीय EPF कर्मचाऱ्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, स्थानिकांचं खड्ड्यांविरोधात आंदोलनगडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विभागाची अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. राज्यात आदिवासी विकास विभागातर्फे ५५१ अनुदानित, तर ४९३ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.

राज्यात २००२ ते २०१२ या दहा वर्षांत ७९३ आदिवासी विद्यार्थ्यांचा आश्रमशाळांमध्ये मृत्यू झाला होता. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र तळपे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ३० मे २०१६ रोजी राज्य शासनाने डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करीत आश्रमशाळांमधील सुरक्षा उपाययोजना सुचविण्याचे निर्देश दिले होते. समितीने १९ ऑक्टोबर २०१६ रोजी अहवाल शासनाला दिला असला तरी, तो कागदावरच आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील आश्रमशाळांमध्ये २५६ विद्यार्थ्यांनी जीव गमावला आहे.

Maharashtra TimesMobile Blast News : नव्या कोऱ्या फोनचा पँटच्या खिशात स्फोट, तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, हातही भाजले‘आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी असून, या संख्येत घरी मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तरीही दोन महिन्यांत आश्रमशाळांमधील मृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील. सर्व आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाईल. सुरक्षाव्यवस्था नसलेल्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल,’ असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत