Headlines

गोंदिया-जबलपूर मार्गाचं दुपदरीकरण, राज्यातील अनेक गावांमध्ये रेल्वेचा विस्तार; 9 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी| Maharashtra Times


Gondi-Jabalpur Railway Project: मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंजळाच्या बैठकीत महाराष्ट्रासह चार राज्याती 9,702 कोटींच्या रेल्वे विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

gondia to jabalpur railway doubling
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: गोंदिया-जबलपूर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह चार राज्यांतील सुमारे ९,७०२ कोटी रुपयांच्या रेल्वे विस्तारीकरण प्रकल्पांना मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कच्च्या तागाच्या हमीभावात २७५ रुपये प्रती क्विंटल वाढ, श्रीनगर विमानतळावर १,६७७ कोटी रुपये खर्चून ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ हे भव्य संकुल बांधणे या ठळक प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरील सेवातीर्थ येथे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) हलविल्यानंतरची केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीपीए) रेल्वे मंत्रालयाच्या तीन महत्त्वाच्या रेल्वेमार्ग विस्तारीकरणाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. ‘प्रधानमंत्री गतिशक्ती’ राष्ट्रीय योजनेतील या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील गोंदिया-जबलपूर मार्ग दुपदरीकरणाचा समावेश आहे.

Maharashtra TimesKarjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल थेट लोकलने प्रवास, डोंगरातून बोगदा तयार; 29 किमी लांब मार्गिकेने 30 मिनिटांत होणार अंतर पार

भारतीय रेल्वेचं जाळं वाढणार

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे ३०७ किलोमीटरने वाढणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे सुमारे ५,४०७ गावे आणि जवळपास ९८ लाख लोकसंख्येचा रेल्वेसंपर्क व स्थानिक रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल. या रेल्वेमार्ग विस्तारामुळे जबलपूरचे कचनार शिव मंदिर, बालाघाटमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, धुआंधार धबधबा आणि दलमा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या अनेक पर्यटनस्थळांचा रेल्वेसंपर्क सुधारेल, असाही रेल्वेचा दावा आहे.

मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत सुमारे पावणेतीनशे रुपयांनी वाढ करून ती ५,९२५ रुपये प्रतिक्विंटल करण्यासही मान्यता दिली. यामुळे तागाच्या अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ६१.८ टक्के नफा मिळण्याची आशा आहे.

सेवासंकल्प

सेवातीर्थावर घेतलेला प्रत्येक निर्णय १४० कोटी देशवासीयांच्या सेवेच्या भावनेने प्रेरित असेल आणि राष्ट्र उभारणीच्या व्यापक ध्येयाशी जोडला जाईल, असा संकल्प नवीन पंतप्रधान कार्यालय संकुलात झालेल्या पहिल्या बैठकीत मंत्रिमंडळाने सोडला. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी प्रत्येक मंत्र्याने एकेक ‘शुभवार्ता’ मंत्रिमंडळ बैठकीत सांगावी, अशी इच्छा पंतप्रधानांनी स्वतः व्यक्त केल्याचे समजते.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा