Dhule Nagaon Village 28 Year Old Youth Suhas Died of Heart Attack Practicing Running for Police Recruitment; आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले
Dhule Nagaon Village 28 Year Old Youth Suhas Died of Heart Attack Practicing Running for Police Recruitment; आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले
Dhule Youth Dies : आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावरचा खाकी वर्दीचा रुबाब अन् अचानक सगळंच संपलं! धुळ्यात धावण्याचा सराव करताना 28 वर्षीय सुहासचा हृदयविकाराच्या झटक्यानं करुण अंत झाला.
धुळे नगाव तरुणाचा मृत्यू
अजय गर्दे, धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथे पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना एका 28 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुहास संभाजी पाटील (वय 28) हा महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होता. सध्या तो सुट्टीवर गावी आला होता. 3 ऑगस्ट सोमवारी रोजी सायंकाळी नगाव परिसरात पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावण्याचा सराव करत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि काही क्षणांतच तो खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, नगाव परिसरात धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू होण्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 4 मार्च रोजी एका 19 वर्षीय तरुणाचाही सरावादरम्यान अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, हृदयरोग तज्ज्ञांनी अतिप्रमाणात व्यायाम किंवा अचानक जास्त वेगाने धावल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येऊन ‘कार्डियाक अरेस्ट’चा धोका वाढू शकतो, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलीस भरतीसह अन्य स्पर्धा परीक्षांसाठी शारीरिक सराव करणाऱ्या तरुणांनी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम करावा, नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि शरीरात कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने सराव थांबवून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
नंदुरबारमध्ये काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या फिर्यादीवरून भाजपच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
RAC Ticket Bedroll : रेल्वेत AC कोचमध्ये आता थंडीने कुडकुडत बसावं लागणार नाही, RAC प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार, भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण करताना फिर्यादीविषयी अपमानास्पद, बदनामीकारक व लज्जास्पद शब्दांचा वापर केला. संबंधित संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग करून ते सार्वजनिकरित्या प्रसारित केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला. या ऑडिओ क्लिपमुळे सामाजिक प्रतिष्ठा, मान-सन्मान व प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप त्यांनी केला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा