पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ५३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १९४ अन्वये नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पीएसआय शिरसाठ करीत आहेत.
तरुणी रात्री घरातून बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातराहणारी १८ वर्षीय पल्लवी अभिमन बहिरम ११ ऑगस्टच्या रात्री कुटुंबीयांसोबत जेवण झाल्यानंतर घरात झोपली होती. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ती घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला.
त्याच दरम्यान २३ वर्षीय अरुण जेजीराम चौरे याने एका व्यक्तीला मध्यरात्री संदेश पाठविल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी शिवाऱ्या डोंगर परिसरात शोध घेतला असता दोघेही गंभीर अवस्थेत आढळून आले.
रुग्णालयात मृत घोषित
ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पिंपळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांना ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी दुपारी ४.३० वाजता दोघांनाही मृत घोषित केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
Sonali Gaikwad : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू, महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्य संपवलं, चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र हरपलंया घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनास्थळाचा पंचनामा, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
तपासाला वेग, मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
एकाच ठिकाणी दोघा जणांचे शव आढळून आल्याच्या या घटनेने शेंदवड परिसर हादरला आहे. दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण काय होते आणि या घटनेपूर्वी नेमके काय घडले होते, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.
साडेचारशे विद्यार्थ्यांचे मृत्यू
दरम्यान, राज्यातील शासकीय आणि अनुदानित अशा हजाराहून अधिक आश्रमशाळांवर गेल्या पाच वर्षांत तब्बल सहा हजार २१८ कोटींचा निधी खर्च होऊनही मृत्यूचे तांडव थांबत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांतच ४५६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये २५६ मृत्यू झाले असून, त्यातही नाशिक अपर आयुक्तालयाअंतर्गत २२१ आदिवासी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Bengaluru Accident : मित्रासोबत बाईकने जाताना पडली, 32 वर्षीय EPF कर्मचाऱ्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, स्थानिकांचं खड्ड्यांविरोधात आंदोलनगडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विभागाची अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. राज्यात आदिवासी विकास विभागातर्फे ५५१ अनुदानित, तर ४९३ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
राज्यात २००२ ते २०१२ या दहा वर्षांत ७९३ आदिवासी विद्यार्थ्यांचा आश्रमशाळांमध्ये मृत्यू झाला होता. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र तळपे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ३० मे २०१६ रोजी राज्य शासनाने डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करीत आश्रमशाळांमधील सुरक्षा उपाययोजना सुचविण्याचे निर्देश दिले होते. समितीने १९ ऑक्टोबर २०१६ रोजी अहवाल शासनाला दिला असला तरी, तो कागदावरच आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील आश्रमशाळांमध्ये २५६ विद्यार्थ्यांनी जीव गमावला आहे.
Mobile Blast News : नव्या कोऱ्या फोनचा पँटच्या खिशात स्फोट, तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत, हातही भाजले‘आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी असून, या संख्येत घरी मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तरीही दोन महिन्यांत आश्रमशाळांमधील मृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील. सर्व आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाईल. सुरक्षाव्यवस्था नसलेल्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल,’ असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

