Headlines

पीएम सूर्यघर योजनेला छत्रपती संभाजीनगरात मोठा प्रतिसाद:58 हजारांहून अधिक ग्राहकांच्या खात्यात 410 कोटींचे अनुदान




केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 58 हजार 967 वीजग्राहकांनी घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारले असून, त्यांची एकूण स्थापित क्षमता 206 मेगावॅट इतकी झाली आहे. या लाभार्थ्यांपैकी 52 हजार 763 ग्राहकांच्या बँक खात्यात तब्बल 410 कोटी 33 लाख रुपयांचे अनुदान थेट जमा करण्यात आले असून, उर्वरित लाभार्थ्यांचे अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 47 हजार 530 ग्राहकांनी 166.12 मेगावॅट, तर जालना जिल्ह्यातील 11 हजार 437 ग्राहकांनी 39.88 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील 42 हजार 619 ग्राहकांना 331.31 कोटी रुपये, तर जालना जिल्ह्यातील 10 हजार 144 ग्राहकांना 79.02 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांचा वीज खर्च कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. दोन किलोवॅटसाठी 60 हजार अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत एक किलोवॅट क्षमतेसाठी 30 हजार, दोन किलोवॅटसाठी 60 हजार आणि तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एका किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्मिती होते. त्यामुळे वीजबिल जवळपास शून्यावर येते. याशिवाय अतिरिक्त वीज महावितरणला विकून ग्राहकांना उत्पन्नही मिळू शकते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, फेसलेस आणि पेपरलेस पद्धतीने या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे महावितरणकडून सोलर नेट मीटर विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहेत. मोबाईलवरूनच वीजनिर्मिती, वापर आणि अतिरिक्त वीज युनिटची माहिती ग्राहकांना मिळत असल्याने वीज वापराचे नियोजन करणे अधिक सोपे झाले आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, फेसलेस आणि पेपरलेस पद्धतीने होत असल्यामुळे कार्यालयीन फेऱ्यांचीही गरज राहत नाही. महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, ही योजना ग्राहकांना वीजबिलात बचत करून स्वच्छ ऊर्जेला चालना देणारी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. हेही वाचा.. शून्य आयकर विवरणपत्र भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही:भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्याकडे शेतकऱ्यांची कैफियत‎ कर्जावर दुचाकी घेण्यासाठी सामान्य शेतकरी कर्जदार बँकेकडे शून्य आयकर विवरणपत्र सादर करतो. अशा शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय शासनाने त्वरित दूर करून कर्जमाफी योजनेत सामील करून घ्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी बुधवारी भाजपचे प्रदेश सरचिटणीस व मराठवाडा संयोजक माजी आमदार सुनील राणे यांच्याकडे केली. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत