Dhule Car Accident : धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाट्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे.

इनोव्हा कारचा अक्षरशः चक्काचूर
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारवरील चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं. अनियंत्रित झालेली ही कार वेगाच्याभरात थेट महामार्गावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर घुसली आणि समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला अत्यंत वेगाने जाऊन धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की यात इनोव्हा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
Coastal Road Fire : हॉर्न वाजवून लक्ष वेधलं, दोन कार चालकांची समयसूचकता, कोस्टल रोड बोगद्यात गाडी पेटण्यापूर्वी कुटुंबाची थरारक सुटका
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. सर्व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
देवदर्शनासाठी गेलेल्या नाशिकमधील या कुटुंबावर वाटेतच काळाने असा भयंकर घाला घातल्यानं सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात
छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर गंगापूरजवळ एका भीषण आणि अत्यंत दुःखद अपघातात जालन्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. समोर धावणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून भरधाव दुचाकीने जोरात धडक दिल्याने हा थरकाप उडवणारा अपघात घडला. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर घडली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रितेश राजेश राठोड (वय २३) आणि अविनाश केशव चव्हाण (वय २४, रा. मंठा जि. जालना) असे मयत झालेल्या तरुणांचं नाव आहे.
Abhijeet Dipke: त्यांना मूलबाळ नाही म्हणून जनतेशी काही देणंघेणं नाही; म्हणालो होतो भारतात येऊ नकोस! अभिजीत दिपकेचे आई-वडील संतापले
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण हे दोघे दुचाकीवरून मंठा जि. जालना तालुक्यातून पुण्याकडे निघाले होते. ते दुचाकीने जालन्याहून पुण्याला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर पोहोचताच, महामार्गावरून समोर धावणाऱ्या एका आयशर ट्रकला त्यांच्या भरधाव दुचाकीने पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण जागेवरच कोसळले. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर येथील रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळ गाठले आणि दोन्ही जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉ. विजय केंद्रे यांनी तपासाअंती दोघांनाही मृत घोषित केले.

